‘हा राष्ट्रवादीचा पायगुण’; अजित पवार गटातील नेत्याची प्रतिक्रिया
![Hasan Mushrif said that this is NCP's advantage over BJP in three states](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/12/Narendra-Modi-and-Ajit-Pawar.jpg)
मुंबई : देशातील चार राज्यांच्या निवडणुकांचा निकाल समोर येत आहे. मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यात भाजपाने आघाडी घेतली आहे. तर तेलंगणामध्ये काँग्रेसला बहुमत मिळालं आहे. यावरून अजित पवार गटातील मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड येथे भारतीय जनता आघाडीवर आहे. गेल्यावर्षी सगळीकडे भाजपाचा पराभव झाला होता. कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसचा पायगुण असावा, असं मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले.
हेही वाचा – ‘सनातन धर्माचा विरोध केल्यामुळे काँग्रेसचा पराभव’; काँग्रेस नेत्यांचा घरचा आहेर
कोण कुठे आघाडीवर?
छत्तीसगड (९० जागा)
भाजपा : ५३, काँग्रेस : ३४, जीजीपी : १, बीएसपी : १, सीपीआय : १
मध्य प्रदेश (२३० जागा)
भाजपा : १६१, काँग्रेस : ६६, बीएसपी : २, अन्य : १
राजस्थान (१९९ जागा)
भाजपा : ११२, काँग्रेस : ७१, आयएनडी : ९, बीएसपी : २, अन्य : २
तेलंगणा (११९ जागा)
काँग्रेस : ६५, बीएचआरएस : ३९, भाजपा : ९, एआयएमआयएम : ५, सीपीआय : १.