ताज्या घडामोडीराजकारण

हरियाणात काँग्रेसची आघाडी तर भाजपने मारली मुसंडी

मुख्यमंत्री नायब सिंह सैनि, भूपिंदर सिंह हुड्डा, रणजीत सिंह चौधरी, दुष्यंत चौटला यांच्यासह अनेक दिग्गजांचा फैसला

हरियाणा : हरियाणातील जवळपास सर्व 90 जागांचे अंदाज समोर आले आहेत. यामध्ये काँग्रेसने आघाडी घेतली आहे. तर भाजपने पण मुसंडी मारली आहे. एकूणच हरियाणात काँटे की टक्कर दिसत आहे. मुख्यमंत्री नायब सिंह सैनि, भूपिंदर सिंह हुड्डा, रणजीत सिंह चौधरी, दुष्यंत चौटला, विनेश फोगाट यांच्यासह अनेक दिग्गजांचा फैसला आज होईल. भााजपची गेल्या दहा वर्षांपासून सत्ता या राज्यात असताना आणि डबल इंजिन सरकार असताना भाजपवर मतदारांची नाराजी का ओढावली? याचे आता विश्लेषण सुरू झाले आहे.

कोण ठरणार कुरूक्षेत्राचे पांडव?
सकाळच्या मतमोजणीच्या कलानुसार, काँग्रेसने मोठी आघाडी घेतली आहे. तर आता आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार भाजपने पण विजयाचा शंखनाद केला आहे. सर्वच एक्झिट पोलने काँग्रेसच्या पारड्यात मत टाकले आहे. तर भाजप 20-28 जागांवर दमखम दाखवण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे भाजपच्या या हाराकिरी मागील कारणांचा शोध घेण्यात येत आहे. आता हरियाणाच्या कुरूक्षेत्राचे पांडव कोण होणार हे अवघ्या काही तासात समोर येईल.

हरियाणात भाजपाची हाराकिरी का?

1. भाजपला या विधानसभा निवडणुकीत डबल डेकर सरकार असताना सुद्धा अँटी इनकम्बन्सीचा फटका बसल्याचे समोर येत आहे. सत्तेविरोधातील लाटेचा फटका भाजपाला बसण्याची शक्यता खरी होताना दिसत आहे. याचा अंदाज केंद्रीय नेतृत्वाला अगोदरच आल्याने भाजपाने तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना बाजूला सारले. पण हे पाऊल पण चुकीचे ठरल्याचे सध्यास्थितीवरून दिसून येते. संघटनात्मक बदलाचा मोठा फायदा दिसून आला नाही.

2. बेरोजगारी महत्त्वाचा मुद्दा

बेरोजगारीचा मुद्दा निवडणूक प्रचारात महत्त्वाचा ठरला. विरोधी पक्षांनी त्याचा जोरदार वापर केला. हरियाणात बेरोजगारी दर 2021-22 मध्ये 9 टक्के होता. हा दर राष्ट्रीय दराच्या दुप्पट आहे. राष्ट्रीय बेरोजगारी दर 4.1 टक्क्यांचा घरात आहे. यापूर्वी निवडणूक जाहीरनाम्यात भाजपने 2 लाख नोकऱ्यांचे आश्वासन दिले होते. पण प्रत्यक्षात 1.84 लाख जागा रिक्त होत्या. या काळात 47 परीक्षा या ना त्या कारणाने रद्द करण्यात आल्या. त्याचा फटका भाजपाला बसल्याचे सध्या तरी दिसत आहे.

3. शहरी भागातील मतदारांची नाराजी

भाजपाच्या परंपरागत शहरी मतदाराची मोठी नाराजी असल्याचे राजकीय पंडित पूर्वीपासून सांगत होते. शहरी भागातील मतदारांवर कराचा बोजा आणि महागाईचा फटका असा दुहेरी मार सुरू आहे. कर सवलती न मिळाल्याने देशभरातील शहरी करदाते नाराज आहे. हरियाणा निवडणुकीत शहरी भागातील मतदान कमी झाले आणि प्रभावित झाल्याचे दिसून आले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button