Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

हर्षवर्धन सदगीरचा निवृत्तीचा निर्णय मागे; महाराष्ट्र केसरीची ‘हॅटट्रिक’ साधण्याचा मनोदय

मुंबई :  आपण कुस्ती सुरूच ठेवणार असल्याचे सांगत पुन्हा एकदा महाराष्ट्र केसरी पद मिळवत, पदाची हॅट्ट्रिक करण्याचा मनोदय दुहेरी महाराष्ट केसरी विजेता हर्षवर्धन सदगीरने व्यक्त केला. अकोले तालुक्यातील सह्याद्रीच्या डोंगरकुषीत वसलेले कोंभाळणे हे हर्षवर्धन सदगीरचे मुळगाव. पद्मश्री पुरस्कारप्राप्त बीजमाता राहीबाई पोपेरे याही कोंभाळणेच्याच. महाराष्ट्र केसरी पदाची गदा दोनवेळा जिंकत हर्षवर्धनने कोंभाळणे गावाला नवी ओळख मिळवून दिली.

गावच्या लाल मातीने हर्षवर्धनला घडविले. यात्रां-जत्रांमधील कुस्ती स्पर्धेत भाग घेताना त्याच्यामध्ये कुस्तीची आवड निर्माण झाली. पुढे त्याच्या हट्टामुळे वडिलांनी त्याला भगूर (नाशिक) येथील व्यायामशाळेत प्रशिक्षणासाठी पाठविले. तेथे तो कुस्तीचे धडे गिरवत रमला. वेगवेगळ्या वयोगटात वेळोवेळी सुवर्ण पदके जिंकत गेला. २०२० मध्ये त्याने महाराष्ट्र केसरीचा किताब पटकाविला तर या वर्षी त्या यशाची पुनरावृत्ती करीत तो दुहेरी विजेता बनला.

दोन वर्षांपासून कोंभाळणे या त्याच्या गावी हर्षवर्धन मित्रपरिवाराच्या वतीने कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या वर्षीची स्पर्धा अपूर्व उत्साह आणि जल्लोषात पार पडली. दुसऱ्यांदा महाराष्ट केसरी झाल्याबद्दल आमदार डॉ. किरण लहामटेंच्या हस्ते हर्षवर्धनचा सत्कार करण्यात आला. हर्षवर्धन दोनवेळा महाराष्ट्र केसरी झाला, ही ताकद येथील मातीची आहे. नाशिकमधून तुम्ही महाराष्ट्र केसरी झाला असला तरी तुम्ही अकोल्याच्या मातीचे आहात हे आवर्जून सांगत जा, असे आवाहन डॉ. लहामटे यांनी हर्षवर्धनला केले. हर्षवर्धनला तिसऱ्या वेळेस महाराष्ट्र केसरी होण्यासाठी शुभेच्छा देतानाच त्याने घेतलेला निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची विनंती त्यांनी हर्षवर्धनला केली.

हेही वाचा –  ‘प्रशासकीय कामात पारदर्शकता, कालमर्यादा आणि विश्वासार्हतेच्या त्रिसूत्रीवर सर्व विभागांनी काम करावे’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सर्वांच्या विनंतीला मान देत आपण कुस्ती सोडण्याचा निर्णय मागे घेत असल्याचे हर्षवर्धने यावेळी जाहीर केला. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले. तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होण्याचे स्वप्न आपण शंभर टक्के पूर्ण करू असे सांगत पदाची गदा आपण लवकरच पुन्हा घेऊन येऊ, असा विश्वास त्याने व्यक्त केला.

कोंभाळणेच्या यंदाच्या आखाड्यात अनेक राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवरील मल्ल सहभागी झाले होते. आमदार लहामटे यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाची ५ लाख रुपये इनामी कुस्ती लावण्यात आली. महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख व महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील या दोन महाराष्ट केसरींमधील ही कुस्ती ४५ मिनिटे रंगली. शेवटी कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. रविराज चव्हाण व इराणचा मल्ल हमीद इराण या दोघांच्यात झाली, या लढतीत रविराज चव्हाण याने दोनच मिनिटांत इराणच्या मल्लास अस्मान दाखवले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button