breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेराजकारण

महायुतीच्या बारामतीमधील बैठकीला हर्षवर्धन पाटील, शिवतारेंची दांडी

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघाची महायुतीची समन्वय बैठक रविवारी (१७ मार्च) बारामती येथे होत आहे. शिरूर, बारामती, पुणे लोकसभा मतदारसंघांचे प्रमुख राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे. मात्र, या बैठकीला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि अजितदादांच्या विरोधात दंड थोपटून बारामतीमध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची घोषणा करणारे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे हे अनुपस्थित राहणार आहेत. त्यामुळे महायुतीमधील घटक पक्षांतील नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सकाळी ११ वाजता, मोरोपंत नाट्यगृह, नवीन कचेरी रस्ता, समर्थ नगर, बारामती येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय माशिलकर, भाजपचे दौंडचे आमदार राहुल कुल, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रेय भरणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, राष्ट्रवादीचे दौंड येथील माजी आमदार रमेश थोरात, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, कात्रज दूध संघाचे अध्यक्ष भगवान पासलकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, बाळासाहेब चांदेरे, गीतांजली ढोणे, भारती पांढरे, जिल्हाप्रमुख सुरेंद्र जेवरे, महेश पासलकर, रिपाइंचे प्रदेश संघटन सचिव परशुराम वाडेकर, तसेच महायुतीतील सहयोगी पक्ष लोकजनशक्ती पार्टी, शिवसंग्राम पक्ष, रयत क्रांती संघटना, भीमसेना, पीजेपी, स्वाभिमान, जे.एस.एस, आरएसपी, ब.वि.आ, पीजेपी, राष्ट्रीय स्वराज्य सेना, महाराष्ट्र क्रांती सेना, लहुजी सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहे, असे महायुतीचे समन्वयक संदीप खर्डेकर यांनी सांगितले.

हेही वाचा – यंदा प्रथमच मिळणार ‘वोट फॉर्म होम’ सुविधा

दरम्यान, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पुतण्याचे सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे आणि त्यांचे फॅमिली डॉक्टर देशपांडे यांच्या चिरंजीवांचे पुणे येथील विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याने ते पूर्वसूचनेने अनुपस्थित राहणार आहेत. तसेच शिवसेनेचे नेते विजय शिवतारे रुग्णालयात ॲडमिट असल्याने तेही या बैठकीला अनुपस्थित असणार आहेत, असेही खर्डेकर यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button