‘हारकर जितने वाले को ही बाजीगर कहते है!’ खासदार सुनेत्रा पवारांचा बॅनरची जोरदार चर्चा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/Sunetra-Pawar-1-780x470.jpg)
पुणे | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात पराभव झाला. आता पक्षाने त्यांना राज्यसभेवर पाठवले आहे. त्यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. यानंतर त्यांच्या अभिनंदनाचे बॅनर लागले आहेत. या बॅनरची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.
कात्रज चौकामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे लावलेल्या बॅनरची चर्चा शनिवारी रंगली आहे. रिपाइंच्या सचिन खरात गटातर्फे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची राज्यसभेच्या खासदारपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल बॅनर लावले आहे. त्यावर ‘हारकर जितने वाले को ही बाजीगर कहते है!’ असा उल्लेख करण्यात आलेला आहे. या बॅनर्सवर सुनेत्रा पवार यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. सचिन खरात आणि राजाभाऊ कांबळे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यावर अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे फोटो आहे.
हेही वाचा – ‘..तरीही मराठा समाजात भाजपाबद्दल असंतोष आहे’; चंद्रकांत पाटलांचं विधान
बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांचे भावी केंद्रीय मंत्री म्हणून बॅनर लागले. सुनेत्रा पवार यांची राज्यसभेच्या खासदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असा उल्लेख त्यात करण्यात आला आहे. श्रीकांत जाधव मित्र परिवाराच्या वतीने बारामती शहरात भावी केंद्रीय मंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांचे बॅनर लावले आहे.