“सरकारने पेट्रोल डिझेलच्या किमती कमी केल्या”; हार्दिक सिंग पुरी
![Hardik Singh Puri said that the government has reduced the prices of petrol and diesel](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/Hardik-Singh-Puri-780x470.jpg)
६ एप्रिल २०२२ पासून पेट्रोल, डिझेलचे दर वाढलेले नाहीत
दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून इंधन दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशातच इंधनासाठी आयातीवर असलेला भर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर भडकलेले दर अशी स्थिती असताना सरकारने पेट्रोल डिझेलच्या किमती शक्य तेवढ्या कमी करण्याचा प्रयत्न केला आहे, असा दावा केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हार्दिक सिंग पुरी यांनी केला आहे.
इंधनासाठी आयातीवर असलेला भर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर भडकलेले दर अशी स्थिती असताना सरकारने पेट्रोल डिझेलच्या किमती शक्य तेवढ्या कमी राखण्याचा प्रयत्न केला आहे, असा दावा केंद्रीय मंत्री हार्दिक सिंग पुरी यांनी लोकसभेत केला.
६ एप्रिल २०२२ पासून पेट्रोल, डिझेलचे दर वाढलेले नाहीत. उज्ज्वला योजनेमध्ये गरीब कुटुंबांना विशेष सवलती दिल्या आहेत. त्यामुळे दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे आधीच्या तुलनेत आणखी सिलिंडर खरेदी करत आहेत, असा दावाही मंत्री हार्दिक सिंग पुरी यांनी केला आहे.