breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘शरद पवार म्हणजे वैचारिक व्हायरस’; गुणरत्न सदावर्तेंची खोचक टीका

मुंबई : ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते हे नेहमी आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. दरम्यान गुणरत्न सदावर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना जीभ घसरली आहे. शरद पवार म्हणजे वैचारिक व्हायरस आम्ही संपवणार असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या टीकेमुळे नवा वाद निर्माण होणार असल्याची शक्यता आहे.

गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, आता हे नवीन काय आहे? म्हण शरद पवारांना धमकी दिली आहे. पण त्यांना नेमकी धमकी कुणी दिली. शरद पवारांच्या काळातच दाऊद इब्राहिम उद्याला आला आहे. शरद पवारांचा जो वैचारिक व्हायरस आहे, तो व्हायरस आम्ही संपवणार आहोत.

हेही वाचा – चहा पिताना मस्करी दोघा भावांच्या जीवावर बेतली, पाच जणांवर गुन्हा दाखल

येणाऱ्या काही दिवसांत आम्ही महाराष्ट्रामध्ये शरद पवारांचा वैचारिक व्हायरस आणि त्यांच्या विचारांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी राज्यभर सभा आणि बैठका घेणार आहोत. ती रॅली उद्यापासून आम्ही काढणार आहोत,असंही गुणरत्न सदावर्ते म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button