TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपिंपरी / चिंचवडराजकारण

ग्राऊंड रिपोर्ट: ‘पार्टी वुईथ डिफरन्स’ची ताकद; भाजपाची शिस्तबद्ध रणनिती!

पिंपरी : ‘‘पार्टी वुईथ डिफरन्स’’ अशी ओळख असलेल्या भारतीय जनता पार्टीचे निवडणूक व्यवस्थापन अत्यंत अचूक दिसत आहे. भाजपा + बाळासाहेबांची शिवसेना महायुतीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचाराची यंत्रणा सज्ज झाली असून, आज जोरदार शक्तीप्रदर्शन करीत अर्ज भरण्यात येणार आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघात येत्या दि. २६ फेब्रुवारी रोजी होत असलेल्या पोटनिवडणुकीत भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय, राष्ट्रीय समाज पक्ष व शिवसंग्राम युतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या नावाची घोषणा झाली आहे.

उद्या सोमवारी (ता. ६) उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर भाजपाचे सर्व पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि राज्यातील नेत्यांनी दोन दिवसांपासून विविध पातळीवर जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. भाजपा महायुतीने प्रचाराची सुरूवात केली असताना अद्याप महाविकास आघाडीचे घोडे उमेदवार कोण? इथेच अडकले आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित नाही. आयात उमेदवार नको… असा मोठा मतप्रवाह आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीत इच्छुकांची संख्या जास्त असल्याने बंडखोरीची शक्यता आहे. पिंपरी-चिंचवडच्या भविष्यातील राजकीय वाटचालीची दिशा ठरवणाऱ्या या निवडणुकीत ‘पार्टी वुईथ डिफरन्स’ असलेल्या भाजपाने अत्यंत शिस्तबद्धपणे आघाडी घेतलेली पहायला मिळत आहे.

ना शहराध्यक्ष, ना पालकमंत्री निर्णय थेट केंद्रीय समितीकडे…
भाजपाकडून कोणाला उमेदवारी मिळणार? याबाबत गेल्या आठवड्याभरात जोरदार चर्चा झाली. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप आणि बंधू शंकर जगताप यांचे नाव आघाडीवर होते. जगताप कुटुंबात वाद निर्माण झाला आहे, अशी अफवा उठली. हे प्रकरण हाताळण्यातही भाजपाची कमालीची शिस्त दिसली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या उपस्थितीत सुरूवातील पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यामध्ये अश्विनी आणि शंकर दोघांना एकत्र बसवून प्रसारमाध्यमांसमोर भूमिका मांडण्यात आली. अश्विनी जगताप यांना उमेदवारी घोषीत झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती आणि भाजपाचे संकटमोचक अशी ओळख असलेले गिरीश महाजन यांनी जगताप कुटुंबियांची भेट घेत कोणताही वाद नाही, असा दुजोरा दिला. या सर्व प्रक्रियेत केंद्रीय समितीकडून दिलेल्या निर्देशानुसार कार्यवाही करण्यात आली. विशेष म्हणजे, उमेदवारीचे प्रमुख दावेदार शंकर जगताप यांना निवडणूक प्रमुख जबाबदारी सोपवण्यात आली आणि त्यांनी ती स्वीकारलीसुद्धा. त्यामुळे शहराध्यक्ष, पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्रीसुद्धा जाहीरपणे उमेदवार कोण? याबाबत बोलू शकत नाहीत. हा पक्षशिष्टाचार भाजपाने दाखवून दिला. केंद्रीय समिती निर्णय घेते आणि त्याची अंमलबजावणी होते, अशी अत्यंत शिस्तप्रिय निर्णय प्रक्रिया पिंपरी-चिंचवडकरांना पहायला मिळाली. मात्र, महाविकास आघाडीचा गावखाती कारभार परस्पर विरोधी दिसत आहे. उमदेवारीवरुन नाराजी उफाळून येणार आहे. उमेदवार कोण, चिन्ह कोणते याबाबत अद्यापही एकमत झालेले नाही.

शक्तीप्रदर्शनाची तयारी…
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पिंपळेगुरव ते थेरगाव येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयापर्यंत पदयात्रा काढली जाणार आहे. ही पदयात्रा लक्षवेधी ठरावी यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे, अशी माहिती चिंचवड विधानसभेचे निवडणूक व प्रचारप्रमुख शंकर जगताप यांनी दिली. अश्विनी जगताप यांचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी काढण्यात येणाऱ्या पदयात्रेत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, खासदार श्रीरंग बारणे, भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, आरपीआयच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे, शहराध्यक्ष स्वप्निल कांबळे, राष्ट्रीय समाज पक्षाचे शहराध्यक्ष भारत महानवर यांच्यासह भाजप व मित्रपक्षाचे सर्व स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मित्र पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

…अशी होईल पदयात्रा
भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या पिंपळेगुरव येथील जनसंपर्क कार्यालयापासून सकाळी ९ वाजता पदयात्रेला सुरूवात होणार आहे. गावातील भैरवनाथ मंदिरात दर्शन घेतल्यानंतर सृष्टी चौक, सुदर्शननगर, जवळकरनगर, कल्पतरू फेज १, सुदर्शन चौक, स्वराज गार्डनमार्गे पिंपळेसौदागर गावठाण पुढे शंकर मंदिर, रहाटणी चौक, विमल गार्डन, बळीराज गार्डन, कुणाल गार्डन, बापुजी बुवा मंदिर, थेरगाव हॉस्पिटलमार्गे ग प्रभाग कार्यालयापर्यंत ही पदयात्रा काढण्यात येणार आहे. त्यानंतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत “ग” क्षेत्रीय कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे उमेदवारी अर्ज सादर करण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button