breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडराजकारण

ग्राऊंड रिपोर्ट: उपमुख्यमंत्री अजित पवारांचा दौरा ठरणार पदाधिकाऱ्यांना ‘नवसंजीवनी’

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर समर्थकांना मिळणार ताकद : सत्तेतील सहभागाने महापालिकेतील रसखडलेली कामे मार्गी लागणार!

पिंपरी : विशेष प्रतिनिधी

उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार हे पहिल्यांदाच शहराचा स्वतंत्र दौरा करत आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर संभ्रमात पडलेल्या पदाधिकाऱ्यांसाठी हा दौरा महत्वाचा ठरणार आहे. या दौऱ्यात रखडलेल्या प्रकल्पाची, विकासकामांची अजित पवार आढावा बैठकीतून माहिती घेणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची कामे ही मार्गी लागणार आहेत. त्यामुळे अजित पवारांचा हा दौरा पदाधिकाऱ्यांना ‘नवसंजीवनी’ ठरण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राज्यासह पिंपरी चिंचवड शहरातील पक्षाचे कार्यकर्ते संभ्रमात होते. कोणाच्या बाजूने जावे याचा निर्णय घेणे पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना कठीण जात होते. पिंपरी चिंचवड शहरात अजित पवारांचे असणारे वर्चस्व पाहता बहुतांश जण त्यांच्या साथीला गेले आहेत. काहींनी उघड भूमिका घेतली नसली तरी त्यांनी थेट अजित पवारांना दुखावले देखील नसल्याची वस्तुस्थिती आहे. या बरोबरच गेल्या पाच वर्षात पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्तेत नसल्याने पदाधिकाऱ्यांच्या कामांना गती मिळत नव्हती. दरम्यानच्या काळात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई केल्याने पदाधिकाऱ्यांना ‘निगेटिव्ह इमेज’ ला सामोरे जावे लागले होते. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचा हा दौरा महत्वाचा ठरणार आहे.

उपमुख्यमंत्री पवार यांनी अर्धा दिवस शहराला दिला आहे. सकाळी ९ वाजल्यापासून त्यांनी आपल्या दौऱ्याला केली आहे. या मध्ये ते विविध ठिकाणी आपल्या समर्थकांच्या ठिकाणी भेट देणार आहेत. पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत. शहरात त्यांचे जंगी स्वागत देखील केले जाणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ जाऊन उत्साहाचे वातावरण पाहायला मिळणार आहे. समर्थकांना बैठकीतून ते पूर्ण ताकदीने पाठीशी उभा असल्याचा संदेश देतील. याबरोबरच महापालिका आयुक्तांच्या उपस्थितीत, अधिकाऱ्यांची ते बैठक घेणार आहेत. गेल्या आठवड्यात अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे तक्रारीचे गाऱ्हाणे मांडले होते. महापालिकेच्या आढावा बैठकीतून या तक्रारीचे निवारण होण्याची शक्यता आहे.

एकूणच अजित पवारांच्या दौऱ्याने प्रशासकीय कामे मार्गी लागणार. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतुन उत्साह वाढणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळेच अजित पवारांचा हा दौरा कार्यकर्त्यांसाठी नवसंजीवनी ठरेल.

समर्थक कोण हे स्पष्ट होणार ?

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर दोन्ही पवारांना सांभाळण्याची खबरदारी शहरातील काही बडे पदाधिकारी घेत होते. मात्र शहरात थेट अजित दादांनीच दौरा केल्याने या मध्ये पदाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष आपली भूमिका जाहीर करावी लागली. जे उपस्थित आहेत ते आपले उघड समर्थन करतात आणि जे अनुपस्थित आहेत ते दोन्ही दगडावर पाय ठेऊन आहेत. हेच शुक्रवारी (दि. २५) झालेल्या दौऱ्यातून स्पष्ट झाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button