breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ आज ‘भव्य रॅली’

शिवसेना उपनेते प्रा. नितीन बानगुडे यांची उपस्थिती

पिंपरी | मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवार, दिनांक 11 मे 2024 रोजी चिंचवड विधानसभा क्षेत्रात भव्य दुचाकी व चारचाकी रॅली काढण्यात येणार आहे. संजोग वाघेरे पाटील यांच्यासोबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते व व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत.

या रॅलीची सुरुवात शनिवार, दिनांक 11 मे 2024 रोजी सकाळी साडेआठ वाजता किवळेगाव चौक येथून होणार आहे. पुढे मुकाई चौक – शिंदे पेट्रोल पंप- विकासनगर – आदर्शनगर – मोरेश्वर भोंडवे निवास – शिंदे वस्ती – भोंडवे कॉर्नर – आकुर्डीतील डी. वाय. पाटील कॉलेज – धर्मराज चौक – गुरुव्दारा चौक – वाल्हेकरवाडी चौक – डांगे चौक – काळाख़डक – वाकड – दत्त मंदिर रो़ड – पोलिस लाईन – अॅबियन्स हॉटेल – काळेवाडी फाटा – पिंपळे निलख – पिंपळे सौदागर – शिवार चौक – नाना काटे ऑफिस – रहाटणी फाटा – पाचपीर चौक मार्गे रॅलीचा समारोप ज्योतिबा मंगल कार्यालय येथे होणार आहे.

हेही वाचा     –    ‘निलेश लंकेंचा बंदोबस्त करायचा म्हणजे करायचा’; अजित पवारांचा इशारा 

उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्यासोबत उपनेते व व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील या रॅलीमध्ये सहभागी होतील. त्यांच्यासोबक पिंपरी चिंचवड शहरातील महाविकास आघाडीतील शिवसेनेसह सर्व घटक पक्ष, संघटना यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button