breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर; मतदान केव्हा? वाचा..

पुणे : पुणे जिल्ह्यातील नव्या आणि जुन्या अशा मिळून ३८८ ग्रामपंचायतीची निवडणूका जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे पुणेकरांमधून आनंद व्यक्त केला जात आहे. या निवडणुकीमुळे काहींचा सरपंच होण्याचा तर अनेकांचा पंचायत समिती सदस्य होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होताच इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी येत्या १६ ऑक्टोबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. जानेवारी ते डिसेंबर दरम्यान सदस्यांची मुदत संपणाऱ्या आणि जिल्ह्यात नव्याने स्थापन झालेल्या सुमारे २३१ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक आणि १५७ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत.

हेही वाचा – ‘मला भाजपाचा खूप त्रास आहे’; बच्चू कडूंचा भाजपावर गंभीर आरोप 

१६ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होणार आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 5 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर ६ नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केले जाणार आहेत.

३८८ ग्रामपंचायतींपैकी सर्वाधिक भोर, खेड तालुक्यातील प्रत्येकी ४६ ग्रामपंचायती आहेत. त्या पाठोपाठ आंबेगाव, जुन्नर, मुळशी तालुक्यातील ग्रामपंचायतींची संख्या आहे. आंबेगाव तालुक्यात ४४ , जुन्नरमध्ये ४१ , बारामतीमधील ३२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. दौंड, शिरूर मधील प्रत्येकी १६ , इंदापूर आणि हवेलीतील प्रत्येकी १४ , वेल्हे आणि मावळमधील प्रत्येक ३१ , पुरंदरमधील २२ , मुळशीतील ३७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button