Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘खेळाडूंना दर्जेदार सुविधा व शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यासाठी शासन कटिबद्ध’; मंत्री  माणिकराव कोकाटे

नागपूर : राज्यातील खेळाडूंना दर्जेदार क्रीडा सुविधा व शास्त्रशुद्ध प्रशिक्षण उपलब्ध कॲड.रून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. हॅन्डबॉल मैदानासारख्या सुविधा भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू घडविण्यास निश्चितच उपयुक्त ठरतील. सन 2026 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये महाराष्ट्र व भारतातील खेळाडू उल्लेखनीय यश संपादन करतील, असा विश्वास क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केला.

येथील क्रीडा प्रबोधिनीमधील नव्याने विकसित करण्यात आलेल्या अत्याधुनिक हॅन्डबॉल मैदानाचे उद्घाटन क्रीडा मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी क्रीडा मंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी रवींद्र नाईक, विभागीय उपसंचालक पल्लवी धात्रक, चंद्रपूर जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, वर्धा – आशा मेश्राम, भंडारा – लतिका लेकुरवाळे, गडचिरोली – भास्कर घटाळे उपस्थित होते.

या उद्घाटनप्रसंगी प्रबोधिनीतील खेळाडूंना क्रीडा साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमामुळे खेळाडूंना मोठे प्रोत्साहन मिळाले असून त्यांच्या प्रशिक्षणाला अधिक बळ मिळाले आहे. आशियाई पातळीवरील अॅक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत कांस्यपदक प्राप्त करणाऱ्या नागपूर जिल्हा जिम्नॅस्टिक्स प्रशिक्षण केंद्राच्या खेळाडूंचा मंत्री ॲड. कोकाटे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. या आंतरराष्ट्रीय यशामुळे नागपूर जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात मानाचा तुरा खोवला गेल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

हेही वाचा –  मिशन PCMC : भाजपाकडून इच्छुक उमेदवारीसाठी ‘रेकॉर्ड ब्रेक’ नोंदणी

कार्यक्रमास आंतरराष्ट्रीय खेळाडू व शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त (हॅन्डबॉल) सुनील भोतमांगे व आंतरराष्ट्रीय हॅन्डबॉलपटू इंदरजीत सिंग रंधावा यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी, प्रशिक्षक, खेळाडू, पालक व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमानंतर क्रीडा मंत्री ॲड. कोकाटे यांनी ‘मिशन लक्ष्यवेध’उपक्रमांतर्गत विभागीय क्रीडा संकुल येथील क्रीडा विज्ञान केंद्रास सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या शास्त्रशुद्ध प्रशिक्षण पद्धती, तंदुरुस्ती चाचण्या, आहार नियोजन, पुनर्वसन सुविधा तसेच आधुनिक उपकरणांची पाहणी केली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group