TOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडीदृष्टीक्षेपमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

शासन आपल्या दारीः योजना कल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी

15 एप्रिल पासून ते 15 जून 2023 या कालावधीत या अभियानातून किमान एक लाख लाभार्थ्यांना शासकीय योजनेचा लाभ देणार

पुणेः काही वेळा अनेक लोकांना शासनाकडून त्यांना मिळनार असलेल्या योजनांची माहितीच नसते आणि माहितीच्या अभावी अश्या योजनांचा लाभ गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचला जाऊ शकत नाही. त्यामुळे या योजनांचा उद्देश पूर्णपणे सफल करण्यासाठी शासनाने हे अभियान सुरु केले आहे.

आज आपण पाहणार आहोत शासन आपल्या दारी योजना 2023 योजनेचे फायदे, कोणत्या योजना असतील, सर्व योजना घरबसल्या उपलब्ध होतील. सरकारला आपल्या दारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल, Shasan Aplya Dari Scheme या मागील मुख्य उद्देश आणि योजना काय असेल, तर हा लेख तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. तर मग मित्रांनो बघूया, शासन आपल्या दारी योजनेचे फायदेचे नेमके काय आहेत? शासन आपल्या दारी योजना 2023 साठी सरकार काय योजना आखणार आहे? महाईन्यूजच्या वाचकांसाठी खास…

सरकारी सेवा आणि लाभ मिळविण्यात नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर करणे हा Shasan Aplya Dari Yojana 2023 उपक्रमाचा उद्देश आहे. शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी अनेकदा सर्वसामान्य नागरिकांना सरकारी कार्यालयांचे सतत उंबरठे झिजवावे लागतात. त्यामुळे बऱ्याचदा सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत असतो.

‘शासन आपल्या दारी योजना ’ या योजनेतून प्रत्येक जिल्ह्यात दिनांक 15 एप्रिल पासून ते 15 जून 2023 या कालावधीत या अभियानातून किमान एक लाख लाभार्थ्यांना या उपक्रमातून शासकीय योजनेचा लाभ दिला जाईल. Shasan Aplya Dari Scheme ही राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात यशस्वीरीत्या राबविला जाणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना विविध शासकीय योजनांचे लाभ आणि त्यासाथी विविध महत्त्वाची कागदपत्रेसुद्धा एकाच ठिकाणी मिळणार आहेत. या Shasan aaplya Dari yojana चा राज्यातील सर्वच गरजू व्यक्तींना याचा लाभ मिळेल.

सर्वसामान्य मांणसाची कामे सुलभ तेने व वेळेवर होणे तितकेच गरजेचे असते, कारण वेळ आणि तारीख निघून बऱ्याचश्या योजनाचा लाभ घेणे राहून जाते. शासन प्रत्येक क्षेत्रात विकासाच्या दृष्टीने अनेक योजना राबवत राहते. गरजूंसाठी तो एकमेव आधार तर असतोच त्याचप्रमाणे, सामूहिक विकास प्रक्रियाही त्यातून गतीमान होत असते. हेच लक्षात घेऊन नागरिकांसाठी विविध योजनांचे लाभ मिळावेत व सर्व योजना त्यांच्यापर्यंत पोहचाव्यात यासाठी ‘ Shasan aaplya Dari yojana ’ या विशेष अभियानाच्या माध्यमातून शासन थेट जनतेच्या दारी जाणार आहे.

शासनाची नागरिकांना कागदपत्रे उपलब्ध करुन देणारी जी कार्यालये आहेत ती वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना वेगवेगळ्या ठिकाणी कार्यालयात जावे लागते. या बरोबरच सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्यास त्या दूर करण्यासाठी वारंवार परत त्या कार्यालयामध्ये जावे लागते.

उपक्रमाचा उद्देश प्रामाणिक असेल तर सर्व बाजूंनी माणसे जोडली जातात. ‘शासन आपल्या दारी’ ही मोहीम राज्यातच नाही तर संपूर्ण देश भरात विक्रमी ठरेल आणि महाराष्ट्राचे उदाहरण देशासमोर राहील. याची सर्वस्व खात्री आहे. शासन आपल्‍या दारी ही राज्यात राबविण्यात आलेली क्रांतिकारी मोहीम आहे. 13 मे रोजी पाटण येथून राज्यभरात या मोहिमेला सुरुवात झाली. 15 जून 2023 पर्यंत ही मोहीम चालणार आहे. ‘ शासन आपल्या दारी ‘ मोहिमेवर मुख्यमंत्री सचिवालयाचे संपूर्ण नियंत्रण आणि देखरेखीखाली वेगवेगळ्या ठिकाणी ‘शासन आपल्या दारी योजना‘ हा उपक्रम यशस्वीपणे राबवली जात असल्याचा आनंद होत आहे.

आधार कार्ड
पॅन कार्ड
पासपोर्ट
ई-लेबर कार्ड
पीएम घरकुल योजना
मनरेगा
विवाह नोंदणी
नवीन मतदार नोंदणी
जॉब कार्ड
कृषी सेवा केंद्राचे परवाने
सेवानिवृत्त लाभ
भरती बैठक
पीएम किसन
मुलींना सायकलींचे वाटप
डिजिटल इंडिया
सखी किट वाटप
अपंग साहित्य वाटप
शेतकरी ते थेट ग्राहक बाजार
कृषी प्रदर्शन
शिकाऊ परवाना
अशा विविध योजनांचा शासन आपल्या दारी योजनात समावेश करण्यात येणार असून, ही योजना आता शासन आपल्या दारी घेऊन येणार आहे. आणि या योजनेला शासन आपल्या दारी योजना, असे नाव देण्यात आलेले आहे.

यासाठी जिल्हा, तालुका स्तरावर दोन-दोन दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य जनता, महिला, शेतकरी व विद्यार्थी यांच्या अडचणी त्वरित निकाली काढण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून अभियानाला चालना देण्यात येईल.

शासनाच्या सर्व योजनांचा, उपक्रमांचा लाभ सर्वसामान्यांना त्वरित मिळावा हा या अभियानाचा एकमेव उद्देश आहे. त्यासाठी लागणारी कमीत कमी कागदपत्रे सादर करुन लाभ जलद मंजुरी मिळण्याची प्रक्रिया येथे राबवली जाणार आहे. या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यांतर्गत जनजागृतीची मोहीम ही सुरु करण्यात आली आहे. प्रत्येक गरजूं व्यक्तीला विविध योजनांचा लाभ सहजरित्या व जलदगतीने मिळवून देणारा हा उपक्रम सर्वसामान्यांना दिलासा देणारा आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button