अजित पवारांविषयी बोलताना गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली; म्हणाले,..तर त्यांची
![Gopichand Padalkar's tongue slipped while talking about Ajit Pawar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/ajit-pawar-and-gopichand-padalkar-780x470.jpg)
संभाजी महाराज धर्मवीर नसते तर अशी परिस्थिती झाली असती की नसती?
पुणे : विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काही दिवसांपुर्वी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते, ते स्वराज्य रक्षक होते असं वक्तव्य केलं होतं. या विधानानंतर अनेक नेत्यांनी जोरदार टीका केली होती. याच वक्तव्यावरून भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी टिकास्त्र सोडलं आहे.
संभाजी महाराज धर्मवीर नसते तर संभाजी महाराज धर्मवीर नव्हते, असं म्हणणाऱ्यांनी कदाचित सुंता झाली असती. त्यांना जर तसं वाटत असेल तर प्रसारमाध्यांच्या मित्रांना माझी विनंती आहे की, त्यांनी तिथे जाऊन खरी परिस्थिती काय आहे? हे तपासावं. संभाजी महाराज धर्मवीर नसते तर अशी परिस्थिती झाली असती की नसती? हे मला सांगा, असा सवाल गोपीचंद पडळकरांनी विचारला आहे.
दरम्यान, गोपीचंद पडळकरांच्या टिकेनंतर रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष सचिन खरात आक्रमक झाले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकरांना तत्काळ समज द्यावी, अशी मागणी सचिन खरात यांनी केली.