एकनाथ शिंदे, अजित पवारांनंतर काँग्रेसमधील हा नेता संपर्कात; गिरीश महाजनांचं सूचक विधान
![Girish Mahajan said that after Eknath Shinde, Ajit Pawar, this Congress leader is in touch](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/07/girish-mahajan-780x470.jpg)
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड करत भाजपसोबत सरकार स्थापन केलं. यानंतर आता राष्ट्रावादीचे नेते अजित पवार यांच्यासह जवळपास ४० आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. आता काँग्रेसचे अनेक जण आमच्या संपर्कात असल्याचं मंत्री गिरीष महाजन यांनी म्हटलं आहे.
गिरीश महाजन म्हणाले की, अशोक चव्हाण हे माजी मुख्यमंत्री आहेत. पण आम्हाला पुन्हा तीन उपमुख्यमंत्री तसेच दोन मुख्यमंत्री करता येत नाही. पण कोणाला कधी घेणार? काय म्हणून घेणार? हे सांगू शकत नाही. मात्र २०२४ च्या निवडणुकांच्या आधी राज्यात मोठ्या घडामोडी झालेल्या तुम्हाला दिसतील.
हेही वाचा – राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेने नाविन्यपूर्ण प्रशिक्षण सुरू करावेत–अपर मुख्य सचिव राजेश कुमार
काँग्रेसचे अनेक जण आमच्या संपर्कात आहेत. सगळ्यांचा मान सन्मान ठेवला पाहिजे. मात्र कुणाला घ्यावं, कुणाला काय द्यावं? असा प्रश्न आता आमच्यासमोर आहे. देवेंद्र फडणवीस आमचे नेते आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवारही आहेत. हे त्याबाबत निर्णय घेतील, असं गिरीश महाजण म्हणाले.
आता मंत्रिमंडळ विस्तार झाल्याने अनेकांचे खाते बदलतील. अनेकांचे कमी होतील. आधीच माझ्याकडेही दोन ते तीन जिल्ह्यांचा पालकमंत्रीपदाचा पदभार आहे. तसेच तीन वेगवेगळे खाते आहेत. आता ४० मंत्री होतील. त्यामुळे खाती वाटली जातील, असंही गिरीश महाजन म्हणाले.