माजी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या भावाची गोळी झाडून आत्महत्या

आत्महत्या करण्यापूर्वी ‘गूड बाय’ असा मॅसेज केला
लातूर : देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूकर यांच्या लातूर येथील देवघरमधील निवासस्थानी हनुमंत पाटील यांनी सकाळी गोळी झाडून आत्महत्या केली. हनुमान पाटील हे शिवराज पाटील चाकूरकर यांचे सख्खे चुलत बंधू होते. ते शिवराज पाटील यांच्याकडे मुक्कामी आले होते.
हनुमान पाटील यांनी पुतणे तथा शिवराज पाटील यांचे चिरंजीव शौलेश पाटील यांच्याशी काही विषयांवर चर्चा केली. त्यानंतर शैलेश पाटील बाथरूम मध्ये गेले तेव्हा हनुमंत पाटील यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. शैलेश पाटील बाथरूममधून बाहेर आले तेव्हा त्यांना हनुमंत पाटील हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले.
हनुमान पाटील यांच्या आत्महत्याचे कारण अद्याप समोर आलेलं नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तर विशेष म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी परिचित असलेल्या अनेकांना ‘गूड बाय’ असा मॅसेज केला असल्याचं बोललं जात आहे.





