माजी मंत्री बच्चू कडू यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचं अस्त्र उपसलं
अन्नत्याग आंदोलनामुळे सरकार टेन्शमध्ये

महाराष्ट्र : माजी मंत्री बच्चू कडू यांनी सध्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचं अस्त्र उपसलं आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, या मागणीला घेऊन त्यांनी अन्नत्याग आंदोलन चालू केलं आहे. मोझरी येथे ते या आदोलनाला बसले आहेत. दरम्यान, लोकांच्या डोक्यात हिदू-मुस्लीम द्वेष पेरला जात आहे. मी बलिदान द्यायला तयार आहे, पण शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
आमच्या जीवन मरणाचा प्रश्न…
अन्नत्याग आंदोलनाला बसलेले असताना बच्चू कडू यांनी भाषम केले. यावेळी बोलताना देशातील शेतकरी नेते राकेश टिकेत उद्या इथे येणार आहेत. देशात आता जातीय रंग देण्याचा काम केलं जातंय. राज्यात मराठा आणि ओबीसी वाद पेटवला गेला. त्यामुळे आमच्या जीवन मरणाचा प्रश्न मागे पडत चालला आहे, अशी टीका त्यांनी सरकारवर केली. आमच्या डोक्यात हिंदू-मुस्लीम द्वेष टाकला जात आहे. त्यावर रामबाण उपाय म्हणजे बच्चू कडू यांचे आंदोलन आहे. बाप मेला तरी चालेल पण नेता जिवंत राहला पाहिजे ही व्यवस्था मोडून काढायची आहे. आमच्या बियाण्याचे भाव का कमी झाले नाही, असा सवाल त्यांनी सरकारला केला आहे.
हेही वाचा – राज्य सरकार लवकरच ‘सीएसआर बोर्ड’ तयार करणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा
शेतकऱ्यांच्या मालाचा भाव…
तसेच मत विकायला लाडकी बहीण सुरू केली. पण दुसरीकडे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे भाव पडले आहेत. सरकार सत्तेवर यावे यासाठी लाडकी बहीण योजना आणण्यात आली. त्याच काळात मात्र शेतकऱ्यांच्या मालाचा भाव पडला होता. सरकारला माहीत आहे की बच्चू कडू मेला तरी फ़रक पडत नाही. कारण त्यांनी जाती धर्मात लोकांना गुंतवणूक ठेवले आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
कडोजी महाराजांच्या समाधी परिसरात बेमुदत अन्नत्याग आंदोलन
दरम्यान, आजपासून बच्चू कडू यांचे अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीमध्ये तुकडोजी महाराजांच्या समाधी परिसरात बेमुदत अन्नत्याग आंदोलन चालू झाले आहे. शेतकरी, अपंग, शिक्षक, दिव्यांग, शेतमजूर, मच्छिमार यांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी ते या आंदोलनाला बसले आहेत. त्यामुळे आता या आंदोलनाची सरकार कशी दखल घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.