‘गोळ्या घालून जीवे मारू..’ पुण्यात माजी नगरसेवकाला खंडणीसाठी धमकी
३० लाख रूपये न दिल्यास राजकीय कारकीर्द संपवून टाकू
![Former corporator Avinash Bagve threatened with extortion in Pune](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/Avinash-Bagwe-780x470.jpg)
पुणे : काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे यांच्या मोबाईलवर संपर्क साधून अज्ञात व्यक्तीने ३० लाख रूपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत अविनाश रमेश बागवे यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
बागवे यांच्या मोबईलवर अज्ञाताने व्हाट्सअप कॉल केला. बागवे यांना धमकी देत ३० लाख रूपयांची खंडणी मागितली आहे. खंडणी न दिल्यास निवडणुकीला उभे राहू देणार नाही. गोळ्या घालून जीवे मारू तसेच राजकीय कारकीर्द संपवून टाकू, अशी धमकी अज्ञात व्यक्तीने दिली आहे.
जल्दी से पैसे भेज वर्ना जान से मार देंगे, असे मेसेजमध्ये म्हटलं होतं. आपण खराडीमधून मुस्कान शेख बोलत असून ३० लाख रूपये पाठवून दे, नाहीतर तुला मारण्यासाठी माझी माणसे तयार आहेत, असंही म्हणण्यात आले होते. दोन दिवसांत पैसे दिले नाहीत, तर तुला खल्लास करू, अशी धमकी आल्याचे बागवे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे.