breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

कर्नाटक विधानसभा निवडणूकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, ५२ नवीन चेहऱ्यांना संधी

Karnataka Election : कर्नाटक विधानसभा निवडणूकीच्या २२५ जागांसाठी भाजपने आपल्या १८९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. याबाबत भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या घरी बैठक पार पडली. यावेळी गृहमंत्री अमित शाह, अरुण सिंह, धर्मेंद्र प्रधान, मनसुख मांडविया आणि आदी नेते उपस्थित होते.

यामध्ये ५२ नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये ३२ उमेदवार ओबीसी, ३० एससी आणि १६ एसटी प्रवर्गातील आहे. तसेच ९ उमेदवार डॉक्टर, 31 उमेदवार पोस्ट ग्रॅज्युएट, ५ वकिल, १ आयईएस, १ आयपीएस, तीन सेवानिवृत्त अधिकारी आणि आठ महिलांना तिकिट देण्यात आले आहे

भाजपचे वरिष्ठ नेते ईश्वरप्पा यांनी राजकीय संन्यास घेतला आहे. ईश्वरप्पा यांनी पक्षाच्या बैठकीत मंगळवारी राजकीय संन्यास घेण्यासंदर्भात सांगितले होते. तसेच १० मे ला होणाऱ्या निवडणुकीसाठी मला उमेदवारी देऊ नये असेही त्यांनी यावेळी म्हटलं होते.

दरम्यान, या निवडणुकीसाठी भाजपने देशातील तब्बल ५४ बड्या नेत्यांची फौज तयार केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सहा मोठ्या नेत्यांचा समावेश आहे अशी माहिती मिळत आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री कपील पाटील, आमदार राम शिंदे, जयकुमार रावल, योगेश सागर, प्रसाद लाड यांचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button