breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“मौका सभी को मिलता है,” ‘सत्या’ चित्रपटातील डायलॉग शेअर करत नितेश राणेंचा इशारा

मुंबई |

‘डीएचएफएल’ कर्ज प्रकरणी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि आमदार नितेश राणे यांच्या विरोधात पुणे पोलिसांकडून लुकआउट सर्क्यूलर जारी करण्यात आली. कंपनीकडून घेतलेलं ६५ कोटींचं कर्ज थकवल्याप्रकरणी पुणे गुन्हे शाखेने हे सर्क्यूलर पाठवले आहे. दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीने तक्रार नोंदवली होती. आर्टलाईन प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडने २५ कोटींचं कर्ज घेतलं होते. तर नीलम राणे या आर्टलाईन प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडच्या सहअर्जदार होत्या. या कर्जाची परतफेड न केल्याने तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान, यावर नितेश राणे यांनी ट्विटरवर सत्या चित्रपटातील डायलॉग शेअर करत विरोधकांना इशारा दिला आहे.

नितेश राणे यांनी काल याप्रकरणी थेट ठाकरे सरकारला देखील इशारा दिला होता. हे सर्क्यूलर कुणी काढलं असेल यावर बोलतांना नितेश राणे म्हणाले, “सर्क्यूलर कुणी काढलं हे या ठाकरे सरकारला विचारा. यांची आम्ही झोप उडवत आहोत. आता यांचे सगळे भ्रष्टाचाराचे विषय बाहेर निघणार आहेत. त्यामुळे अडचणी आमच्या वाढणार की ठाकरे सरकारच्या वाढणार हे तुम्हाला येणाऱ्या दिवसात कळेल. तसेच लुकआउट नोटिस संदर्भात आम्ही हायकोर्टात बोलू या गोष्टींशी आमचा सबंध नाही.”

दरम्यान नितेश राणे यांनी आज बदनामिच्या खटल्यासाठी तयार राहा असे, आव्हान देखील दिले आहे. “बदनामीच्या खटल्यासाठी तयार राहा कारण हे लुकआउट परिपत्रक आहे नोटिस नाही! न्यायालयात भेटू माझ्या मित्रांनो” असे ट्विट देखील राणे यांनी केली आहे.

  • ठाकरे सरकार महाराष्ट्र बुडवायला निघालं…

“तसेत सर्क्यूलर त्यांनी आम्हाला नाही तर विमानतळ प्राधिकरणाला पाठवली आहे. त्यामुळे आम्हाला प्रवास करता येणार की नाही हे त्यांना ठरवावं लागणार आहे. आम्ही महाराष्ट्र सोडून जाणार नाही. ठाकरे सरकार महाराष्ट्र बुडवायला निघालं आहे. वर्षानुवर्षे कर भरुन, अधिकृत व्यवसाय करुन आम्ही राजकारण करतो. यांच्यासारखे काळे धंदे आम्ही करत नाही.” असे म्हणत नितेश राणे यांनी काल ठाकरे सरकारवर निशाणा साधला. नितेश राणे एबीपी माझासोबत बोलत होते.

  • महाविकास आघाडीची अडचण होणार…

नितेश राणे म्हणाले, “हे सर्क्यूलर पुणे पोलिसांनी काढलं आहे. पण आमचे डीएचएफएलचे खाचे मुंबई ब्रांचमध्ये आहे. त्यामुळे पुणे क्राईम ब्रांचला हा अधिकार कसा?, तसेच आम्ही ५ महिन्यापुर्वी सबंधित बँकेला आम्हाला लोन सेटल करायचं आहे, असं अधिकृत पत्र दिलेलं आहे. त्यामुळे अशा नोटिसीला उपयोग नाही. या प्रकराणात आम्ही हायकोर्टात जाऊन आव्हान देणार आहोत. नारायण राणेंच्या कुटुंबाच्या अडचणी नाही तर आता क्राईम ब्रांचची अडचण होणार महाविकास आघाडीची अडचण होणार”

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button