breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारण

मध्यप्रदेश, छत्तीसगडसह ५ राज्यांच्या निवडणुका जाहीर, पाहा संपुर्ण माहिती..

नवी दिल्ली : देशातील लोकसभेची लिटमस टेस्ट ठरणाऱ्या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणूकांची घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. मध्यप्रदेश, छत्तीसगड, मिझोराम, राजस्थान आणि तेलंगणा या ५ राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. याबाबतचं वेळापत्रक निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहे.

मिझोराम विधानसभा निवडणुकीचं मतदान ७ नोव्हेंबर घेतलं जाणार आहे. तर छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे. ७ नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान तर १७ नोव्हेंबरला दुसऱ्या टप्प्यातील मतदान घेतलं जाणार आहे.

हेही वाचा – ‘राष्ट्रवादी कोणाची हे महाराष्ट्रातील शेंबडा पोरगा सांगेल’; जयंत पाटलांचा अजित पवार गटाला टोला 

मध्य प्रदेशमध्ये १७ नोव्हेंबरला, राजस्थानमध्ये २३ नोव्हेंबरला तर तेलंगणात ३० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. सर्व पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी ३ डिसेंबर रोजी केली जाणार आहे. ५ डिसेंबरपर्यंत या पाच राज्यातील सर्व निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

२०२३ च्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ६७९ विधानसभा मतदारसंघात सुमारे एक लाख ७७ हजार मतदान केंद्रे उभारली जाणार आहेत. शिवाय पाच राज्यांच्या ९४० हून अधिक आंतरराज्य सीमेवरील चेक पोस्ट्सवर बेकायदेशीर रोकड, दारू, मोफत वस्तू आणि ड्रग्ज वाहतुकीच्या कोणत्याही सीमापार हालचालींवर नियंत्रण ठेवण्यास आम्ही सक्षम आहोत, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button