ताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

निवडणुकीच्या प्रचारातील वादग्रस्त विधान निवडणूक आयोगाच्या रडारवर

बटँगे तो कटेंगे तसेच एखाद्याला धमकी देणे, सामाजिक किंवा धार्मिक भावना ...

महाराष्ट्र : सध्या महाराष्ट्रत विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरु आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाविकासआघाडी विरुद्ध महायुती अशी लढत पाहायला मिळत आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी २० नोव्हेंबरला मतदान पार पडले. आता मतदानानंतर विविध संस्थांनी केलेले एक्झिट पोल समोर येत आहेत. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार महायुतीला 129 ते 139 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर महाविकासआघाडीला 136-145 जागा मिळू शकतात असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तर इतर आणि अपक्ष यांना 13 ते 23 जागा मिळू शकतात असा अंदाज आहे. त्यातच आता राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये प्रचारासाठी वापरण्यात आलेल्या वादग्रस्त विधानांवर निवडणूक आयोग कारवाई करण्याची शक्यता आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातील वादग्रस्त विधान निवडणूक आयोगाच्या रडारवर आले आहे. नुकतंच केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्तांनी एक अहवाल मागवला आहे. यात महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान वापरण्यात आलेले वादग्रस्त विधानांचा अहवालांचा समावेश आला आहे. बटँगे तो कटेंगे तसेच एखाद्याला धमकी देणे, सामाजिक किंवा धार्मिक भावना भडकवणाऱ्या विधानांचाही अहवाल निवडणूक आयोगाने मागवला आहे.

येत्या १५ दिवसात हा अहवाल द्यावा, अशा सूचना राज्यातील निवडणूक अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरातून आतापर्यंत 15 अहवाल पाठवण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. आता यावर निवडणूक आयोग नेमकी काय कारवाई करणार याची राजकीय वर्तुळात उत्सुकता पाहायला मिळत आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button