शिंदे-फडणवीस सरकारची मोठी घोषणा! अहमदनगरचं नामांतर अहिल्यादेवी होळकर नगर होणार
![Eknath Shinde said that Ahmednagar will be renamed Ahilya Devi Holkar Nagar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/05/Eknath-Shinde-5-780x470.jpg)
मुंबई : अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकरांचं नाव द्यावं अशी मागणी वारंवार होत आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील अहमदनगर जिल्ह्याचं नामांतर अहिल्यानगर व्हावं अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाल की, अहिल्यादेवी यांचे माहेरचं आडनाव शिंदे होते आणि मी पण शिंदे आहे. अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करतो. त्यामुळे अहमदनगरच लवकरच नामांतर अहिल्यानगर म्हणून करणार, राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. नाव बदलण्याचा निर्णय आमच्या काळात होतोय हे आमचे भाग्य आहे.
हेही वाचा – पुणे, पिंपरी-चिंचवड पोलीस दलाच्या पायाभूत सुविधेसाठी १०० कोटी रुपयांचा निधी
अहिल्यादेवी यांचं कार्य हिमालया ऐवढं मोठं आहे. त्यामुळे अहमदनगरच नामांतर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अहिल्यादेवींचं कर्तुत्व हिमालयाएवढं आहे. त्यामुळेच या अहमदनगरला त्यांचं नाव दिलं जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.