‘पंकजा मुंडे संभ्रमावस्थेत आहेत, म्हणून..’; एकनाथ खडसे यांचं विधान
![Eknath Khadse said that Pankaja Munde is in confusion](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/09/Pankaja-Munde-and-Eknath-Khadse-780x470.jpg)
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी उपमुख्यमंत्री यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. फडणवीसांना प्रदेशाध्यक्ष होण्यासाठी मोठी मदत केली. म्हणून ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत येऊ शकले. पण, फडणवीसांनी व्यक्तीगत रित्या माझा छळ करण्याची भूमिका घेतली. हे मला योग्य वाटत नाही, अशी खंत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे. तसेच पंकजा मुंडे यांच्याबाबतही मोठं विधान केलं आहे.
एकनाथ खडसे म्हणाले, देवेंद्र फडणवीसांना अनेक गोष्टी शिकवण्यात माझा हात आहे. २०१४ पूर्वी विधानसभेत मी जिथे बसायचो, त्याच्या पाठीमागील जागा मी फडणवीसांना दिली होती. विरोधी पक्षनेते असताना माझ्याऐवजी बोलण्याची संधी फडणवीसांना दिली. महाराष्ट्रातील अनेक प्रश्न त्यांनी उललले. त्यांचं कौशल्यही त्यात होतं.
हेही वाचा – लक्ष्मणभाऊंचा अध्यात्मिक वारसा शंकरभाऊंनी सक्षमपणे जपला!
नंतरच्या कालखंडात फडणवीसांनी कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. फडणवीसांना प्रदेशाध्यक्ष होण्यासाठी फार मदत केली. म्हणून ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत येऊ शकले. मात्र, व्यक्तीगत रित्या माझा छळ करण्याची भूमिका त्यांनी घेतली. हे मला योग्य वाटत नाही. राजकारण राजकारणाच्या जागेवर आहे. पण, सुडाचं राजकारण महाराष्ट्राला शोभत नाही, असं एकनाथ खडसे म्हणाले.
विनोद तावडे सावरले आहेत. ते महाराष्ट्रातून दिल्लीला गेलेत. पंकजा मुंडे संभ्रमावस्थेत आहेत. म्हणून त्यांनी अद्याप कोणता निर्णय घेतला नाही. मी निर्णय घेऊन वेगळी दिशा आणि मार्ग अवलंबला. पंकजा मुंडे यांना काही सल्ला देऊ अशी स्थिती नाही. पंकजा मुंडे परिपक्व आहेत, असंही एकनाथ खडसे म्हणाले.