breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘गिरीश महाजनांचे सलीम कुत्तासोबत संबंध’; एकनाथ खडसेंचा गंभीर आरोप

नागपूर : १९९३ बॉम्बस्फोटातील आरोपी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा राईट हँड सलीम कुत्ता याची सध्या जोरदार चर्चा आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. महजनांचा सलीम कुत्तासोबत संबंध असल्याचा आरोप त्यांनी विधानपरिषदेत फोटो दाखवत केला आहे.

एकनाथ खडसे म्हणाले, सलीम कुत्ता यांच्याशी गिरीश महाजन यांचे संबंध आहेत. त्यामुळं यांच्यावर दहशतवाद विरोधी गुन्हे दाखल करावेत. ग्रामविकास मंत्री यांच्या भेटीचे फोटो समोर आले आहेत. जर बडगुजर यांचं नाव घेतलं जातं मग गिरीश महजन यांचं नाव का घ्यायचं नाही? गिरीश महाजन यांचं सदस्यत्व रद्द करण्यात यावं. या प्रकरणी एसआयटी चौकशी स्थापन करण्याचें आदेश आपण तत्काळ उपसभापती निलम गोऱ्हे यांनी द्यावेत असे आम्हाला वाटतं. सरकारने तात्काळ कारवाई करावी. बॉम्ब स्फोटाशी सबंधित गिरीश महाजन यांचा राजीनामा घ्यावा.

हेही वाचा  –  महापालिका नोकर भरती : पात्र ३८८ उमेदवारांसाठी आमदार लांडगे सरसावले! 

एकनाथ खडसे यांच्या मागणीनंतर विधानपरिषद सभापती नीलम गोऱ्हे यांनी गिरीश महाजन यांचे सलीम कुत्ता सोबतचे फोटो एकनाथ खडसेंन ते दाखवू नयेत असे निर्देश दिले आहे. नीलम गोऱ्हे यांनी एकनाथ खडसे यांनी मांडलेली २८९ ची चर्चा फेटाळली.

यानंतर अंबादास दानवे म्हणाले, एक लग्न २०१७ साली झालं. इक्बाल कासकर यांची सून आले होते. या लग्नावर आयबीचे लक्ष होतं. सुधाकर बडगुजर यांचा सोबत बोलताना सलीम कुत्ता याचा फोटो व्हायरल झाला आहे. परंतु अशी माहिती मिळाली की, १९९८ मध्ये सलीम कुत्ता याचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती एक आमदार एका पत्रकाराला विधीमंडळ परिसरात सांगत होता.

यानंतर मंत्री शंभूराजे देसाई म्हणाले, ज्या व्यक्तीचे सभागृहात नाव घेण्यात आले. तो कुठेही जेवताना दिसत नाही. परंतु एका पक्षाचा महानगर प्रमुख हा नाचताना पाहिला मिळत आहे. विनाकारण या ठिकाणी एका मंत्र्यांचा उल्लेख करण्यात आला तो तात्काळ काढून यावा, अशी मागणी त्यांनी केली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button