हसन मुश्रीफ यांच्या निकटवर्तियांवर पुण्यात ९ ठिकाणी ईडीची छापेमारी
१०० कोटींचा घोटाळा केल्याचा हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप
![ED raids at 9 places in Pune on Hasan Mushrif's relatives](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/hasan-mushrif-780x470.jpg)
पुणे : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित मनी लॉन्ड्रींग प्रकरणात अंमलबजावणी संचनालयाने (ईडी) पुण्यात आज सकाळी (३ एप्रिल) ९ ठिकाणी एकाच वेळी छापे घातले.
हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित पुण्यातील व्यवसायिकांच्या घरी ही कारवाई करण्यात येत आहे. व्यवसायिक विवेक गव्हाणे, सी.ए. जयेश दुधेडीया आणि वादग्रस्त ब्रिक्स कंपनीचे संचालक चंद्रकांत गायकवाड यांच्यावर ईडीने छापेमारी केली आहे. पुणे शहरातील सॅलिस्बरी पार्क, गणेश पेठ, हडपसर, प्रभात रोड, सिंहगड रोडसह इतर ठिकाणी छापेमारी करण्यात येत आहे.
ईडी छापेमारी करत असलेल्या ठिकाणांच्या जागेवर जाण्यास इतरांना प्रतिबंध करण्यात आलेला आहे. वेगवेगळे व्यवसायिक यांच्याशी नेमके कोणत्या प्रकारचे आर्थिक व्यवहार झाले आहेत, त्याची कोणती कागदपत्रे आहेत त्याबाबत कोणते पुरावे मिळू शकतात का ? याबाबतची तपासणी ईडीच्या पथकामार्फत करण्यात येत आहे.
हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित नातेवाईक व्यवसायिकांवर यापूर्वीही ईडीने छापेमारी करत कारवाई केलेली आहे. त्यांच्या निवासस्थानावर आतापर्यंत तीन वेळा छापेमारी करण्यात आली आहे. ते अध्यक्ष असलेल्या जिल्हा बँकेचीही चौकशी सुरू आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर १०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे.