breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

मत मागायला येऊ नका! भंडारा जिल्ह्यात ओबीसींच्या घरांवर झळकल्या पाट्या

गोंदिया | प्रतिनिधी

आरक्षण नाही तर मतदान नाही, आता मत मागायला येऊ नका, अशा पाट्या भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात ओबीसींच्या घरावर लागल्या आहेत. या पाट्या पाहून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी मैदानात असलेले उमेदवारही हादरले आहेत. मागास प्रवर्गातील निवडणुका स्थगित झाल्याने ओबीसी समाजाकडून असा संताप व्यक्त होत आहे़. इतर मागासवर्गीयांना आरक्षण बहाल करणाऱ्या राज्य सरकारच्या वटहुकमाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली़ त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने आदेश काढून नामाप्र प्रवर्गातील निवडणुकीला स्थगिती दिली.

भंडार जिल्हा परिषदेच्या १३, पंचायत समितीच्या २५ जागांवरील निवडणूक या आदेशामुळे स्थगित झाली. त्यामुळे ओबीसी संघटना आक्रमक झाल्या आहेत. ठिकठिकाणी सभा घेऊन या निणर्याचा निषेध केला जात आहे़ ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणुका घेऊ नका, अशी मागणी होत आहे. भंडारा तालुक्यातील पिंपरी पुनवर्सन येथे ओबीसी समाजाच्या घरावर मतबहिष्काराच्या पाट्या झळकत आहेत़ घराच्या दर्शनी भागात लावलेल्या या पाट्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. भंडारा जिल्हा परिषदच्या ३९ गट व पंचायत समितीच्या ७९ गणातील निवडणूक २१ डिसेंबर रोजी होत आहे़ जिल्हा परिषदेसाठी ३६१ तर पंचायत समितीसाठी ५४४ उमेदवार रिंगणात आहेत. परंतु, या उमेदवारांना ओबीसी बांधवांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button