ताज्या घडामोडीराजकारण

डोनाल्ड ट्रम्पचे कल्पेश मेहता आणि पंकज बंसल यांचे निकटवर्तीय

डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याच्यावेळी दोन पाहुण्यांची खास चर्चा

दिल्ली : अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून काल डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतली. डोनाल्ड ट्रम्प यांचं भारतात कोणाबरोबर सर्वात जास्त जमतं? जवळचा मित्र कोण? तर पटकन नरेंद्र मोदी यांचं नाव येईल. पण डोनाल्ड ट्रम्प यांची मोदींसोबतची मैत्री राजकीय आहे. त्या पलीकडेपण ट्रम्प यांचा भारतात एक खास माणूस आहे. ट्रम्प यांचा त्यांच्यावर विश्वास आहे. मागच्या 13 वर्षांपासून दोघांमध्ये व्यावसायिक नातं आहे. या व्यक्तीच नाव आहे ट्रायबेका डेवलपर्सचे मालक कल्पेश मेहता. ट्रम्प टॉवर ही डोनाल्ड ट्रम्प यांची रियल इस्टेट कंपनी आहे. ट्रायबेका डेवलपर्सची ट्रम्प टॉवरसोबत बिझनेस पार्टनरशिप आहे. कल्पेश मेहता भारतात ट्रम्प टॉवर सोबत मिळून रियल इस्टेटचा व्यवसाय संभाळत आहेत. दोघांमध्ये मागच्या 13 वर्षांपासून भागीदारी आहे. हे कल्पेश मेहता कोण आहेत? त्यांचा किती मोठा व्यवसाय आहे? जाणून घेऊया.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याच्यावेळी दोन पाहुण्यांची खास चर्चा होती. डोनाल्ड ट्रम्प यांच्या निमंत्रणावरुन ते खास अमेरिकेला गेले होते. कल्पेश मेहता आणि पंकज बंसल. दोघेही डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय आहेत. कारण दोघांच कनेक्शन ट्रम्प यांच्या भारतातील बिझनेसशी आहे.

कोण आहेत कल्पेश मेहता?
कल्पेश मेहता हे मुंबईत राहणारे भारतीय उद्योजक आहे. मेहता यांचं रियल एस्टेट सेक्टरमध्ये मोठं नाव आहे. ट्रिबेका डेवलपर्सचे ते फाऊंडर आहेत. मेहता भारतातील डोनाल्ड ट्रम्प यांच्या बिझनेसची देखरेख करतात. ते भारतीय मार्केटमध्ये ट्रम्प टॉवर्ससाठी लायसेन्स प्राप्त इंडियन पार्टनर आहेत. याआधी त्यांनी अनेक मोठ्या प्रतिष्ठीत कंपन्या हाउसर, लीमन ब्रदर्स, द कार्लाइल ग्रुप आणि स्टारवुड कॅपिटल ग्रुपसाठी काम केलं आहे.

भारतातून ट्रम्प यांच्या शपथविधीला कोण उपस्थित होतं?
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत मेहता यांचं 13 वर्षांपासून नातं आहे. ट्रम्प रियल एस्टेट ब्रांडला भारतात आणण्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्यामुळे भारताच्या रियल एस्टेट बाजारात लक्जरी वाढली. पुणे, गुरुग्रामसह अन्य शहरात ट्रम्प टॉवर्ससोबत ट्रिबेका डेवलपर्सने अनेक प्रॉपर्टी विकसित केल्या आहेत. डोनाल्ड ट्रम्प ज्यूनियरसोबत कल्पेश मेहता यांचे घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे ट्रम्प कुटुंबासोबत त्यांचे संबंध अजून मजबूत झाले. डोनाल्ड ट्रम्प यांचं राष्ट्राध्यक्ष होणं हे भारतासाठी फायद्याच की तोट्याच हे लवकरच समजेल. ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात मोदी आणि ट्रम्प यांची घनिष्ठ मैत्री दिसून आली होती. भारताकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी, नीता अंबानी उपस्थित होत्या. डोनाल्ड ट्रम्प काय निर्णय घेणार? याचीच उत्सुक्ता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button