breaking-newsताज्या घडामोडीपुणेराजकारण

‘लोकांमधील खासदार हवाय की सेटवरचा?’; आढळराव पाटील यांचा तरुणांना प्रश्न

पुणे : कुंजीरवाडी येथे गावभेट दौर्‍यातील सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, ज्यांनी पाच वर्षांत रुपयाचा निधी आणला नाही, ज्यांच्या बोलण्यात वास्तविकता नाही, अशा व्यक्तीला दूर करायची हीच संधी लोकसभेच्या निवडणूकीच्या निमित्ताने मतदार म्हणून तुम्हाला आहे.

तुम्हाला स्टुडिओच्या सेटवरचा खासदार पाहिजे का लोकांमध्ये असणारा पाहिजे हे ठरवण्याची देखील हीच वेळ आहे. अशी साद महायुतीचे शिरूर लोकसभेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी तरुण मतदारांनी दिली.

देशाचे भवितव्य ठरविणारी ही महत्वाची निवडणूक आहे. या मतदारसंघातील केंद्राच्या निधीवर उभे राहणारे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मोदींना पाठबळ द्यावे लागेल, त्यासाठी खासदार म्हणून पुन्हा एकदा मला पाठबळ द्या.

हेही वाचा – ‘देवेंद्र फडणवीस मागे लागले म्हणून भाजपमध्ये प्रवेश केला’; नारायण राणेंचं विधान

यावेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, हवेली तालुका अध्यक्ष दिलीप नाना वल्हेकर, पीडीसीसी बँकेचे संचालक प्रदीप कंद, बाजार समिती सभापती दिलीप काळभोर,

हवेली बाजार समितीचे संचालक राजाराम कांचन, शिवसेनेचे विपुल शितोळे, व्हीजेएनटी सेलचे हवेली तालुका अध्यक्ष दिलीप गाडेकर आदी यावेळी उपस्थित होते. या दौर्‍यादरम्यान आढळराव पाटील यांनी दादासाहेब तुपे, सचिन तुपे, सुमित तुपे यांच्या निवासस्थानी भेट दिल्या.

गेल्या १५ वर्षात तुमच्या भागात आतापर्यंत कितीतरी वेळा या भागात मी आलो आहे. अनेक कामांसाठी खासदार निधी दिला आहे. त्यात रस्ते असतील अन्य प्रकल्प असतील त्यासाठी कायम तुमच्यासाठी कार्यरत राहिलो आहे. आता तर मतदारसंघातील मोठे प्रकल्प मार्गी लावायचे आहेत.त्यासाठी लोकसभेत जाण्यासाठी तुमचे पाठबळ हवे.-शिवाजीराव आढळराव पाटील, महायुतीचे उमेदवार शिरुर लोकसभा मतदारसंघ

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button