ताज्या घडामोडीराजकारण

दिलजीत दोसांजची नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नरेंद्र मोदींची भेट

अनेकांना आश्चर्याचा धक्का,दिलजीत दोसांझचे कौतुक करताना दिसत आहेत

दिल्ली : पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांज याची नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही. त्याची गाणी जगभरात गाजत असतात, पंजाबी गाण्यांसोबतच तो बॉलिवूडमधील काही चित्रपटांमध्येही झळकला असून त्याचे लाखो चाहते आहेत. 2024 मध्ये त्याने देशभरात विविध ठिकाणी टूर करत कॉन्सर्टस केले, ज्याला अनेकंनी हजेरी लावली. गेलं वर्ष गाजवल्यानंतर दिलजीतने 2025 सालची सुरूवातही दणक्यातच केली असून त्याने नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत इन्स्टा हँडलवरून या भेटीचा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून दिलजीतनेही त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. नवीन वर्षाच्या सुरूवातीलच आपल्या कलाकाराचे हे फोटो पाहून चाहते अवाक् झाले असून काहींनी तर सॉलिड कमेंट्सही केल्या आहेत. हे तर अनोखं क्रॉसओव्हर असल्याचं चाहत्यांच म्हणणं असून या पोस्टवर लाखो लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झालाय.

पंतप्रधान मोदींनी दिले आशीर्वाद
पंतप्रधान मोदींची भेट घेण्यासाठी आलेल्या दिलजीतने काळ्या रंगाचे फॉर्मल कपडे घातली होते. पंतप्रधानांना पाहताच त्याने त्यांना सॅल्युटही केला. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ब्राऊन रंगाच्या जॅकेट, कुर्त्यामध्ये दिसले. दिलजीतला भेटून तेही खुश होते, त्यांनी त्यांचा आनंद व्यक्त केला. पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर दिलजीतने त्यांना एक पुष्पगुच्छही भेट दिला. त्यांच्या या भेटीच्या व्हिडीोसह अनेक फोटोही सोशल मीडियावर शेअर करण्यात आले असून ते वेगाने व्हायरलही झालेत. काही फोटोंमध्ये दिलजीत आणि पंतप्राधन मोदी गप्पा मारताना दिसले तर काही फोटोंत मोदींनी दिलजीतला आशीर्वादी दिला.

पंतप्रधानांकडून कौतुक
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये नरेंद्र मोदी हे दिलजीत दोसांझचे कौतुक करताना दिसत आहेत. गावातील एका मुलाने कठोर मेहनत करून नाव कमावलं, जगभरात त्याचं कौतुक होतंय हे पाहून बरं वाटत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. यादरम्यान दिलजीतने पंतप्रधान मोदींसमोर पंजाबी गाणंही सादर केलं.

काही दिवसांपूर्वीच, नरेंद्र मोदींनी बॉलीवूडचे शोमन राज कपूर यांच्या कुटुंबाची भेट घेतली होती. तर आता त्यांनी नवीन वर्षाच्या सुरूवातीला गायक दिलजीत दोसांजची भेट घेतली. अलीकडेच दिलजीत दोसांझने त्याची दिल-लुमिनाटी टूर संपवली. त्याचा हा दौरा अतिशय यशस्वी ठरला आणि जगभरात चर्चाही झाली.

दिलजीत दोसांझच्या या व्हिडिओवर चाहत्यांकडूनही प्रतिक्रिया येत आहेत. 2025 ची सर्वात अनपेक्षित भेट (Crossover) अशी कमेंट एका चाहत्याने केली. तर 2025 ची ही सर्वोत्तम सुरुवात असल्याचे लिहीत एका चाहत्याने त्याचा आनंद व्यक्त केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button