कंत्राटी भरतीचा जीआर रद्द; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
![Devendra Fadnavis said that the GR of contract recruitment has been cancelled](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/10/Devendra-Fadnavis-3-780x470.jpg)
मुंबई : कंत्राटी भरतीवरून राज्यातील राजकारण सध्या चांगलच तापलं आहे. विरोधी पक्षातील नेत्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्य सरकारने कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कंत्राटी भरतीचं पाप १०० टक्के काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी मी चर्चा केली आणि त्यांना सांगितलं की, त्यांच्या पापाचं ओझं आपण का उचलायचं. त्यामुळे त्या सरकारने काढलेला कंत्राटी भरतीचा जीआर आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा – ‘सरकारला आता सुट्टी नाही’; मनोज जरांगे पाटलांचा सूचक इशारा
🕛12.05pm | 20-10-2023📍Sahyadri Guest House, Mumbai | दु. १२.०५ वा | २०-१०-२०२३📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई.
LIVE | पत्रकार परिषद#Mumbai #Maharashtra #PressConference https://t.co/bwGZz0Wchq
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 20, 2023
महाराष्ट्रात कंत्राटी भरतीवरून मोठ्या प्रमाणात गदारोळ केला जात आहे. विशेष म्हणजे जे याचे दोषी आहेत, ज्यांनी हे केलंय तेच जास्त आवाज करत आहेत. म्हणून म्हणून कंत्राटी भरतीचे दोषी कोण हे समाजासमोर आलं पाहिजे, यांची थोबाडं उघडी पडली पाहिजे म्हणून काही गोष्टी मी पोहचवण्याचा प्रयत्न करतो आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
कंत्राटी भरतीसाठी महाराष्ट्रात पहिला निर्णय १३ मार्च २००३ रोजी झाला. तेव्हाच्या काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये पहिली कंत्राटी भरती शिक्षण विभागात सुरू झाली. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना २०१० मध्ये जीआर काढून कंत्राटी भरती सुरू करण्यात आली. २०१० मध्ये अशोक चव्हाण यांनी पाहिला जीआर काढला आणि परत त्यांनी ६ हजार कंत्राटी पदांसाठी जीआर काढला, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.