breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

“केंद्राचा अर्थसंकल्प मोठ्या प्रमाणात मध्यामवर्गीयांसाठी”; देवेंद्र फडणवीस

यंदाच्या अर्थसंकल्पाला ग्रोथ बजेट म्हणता येईल

मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्प आज अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी संसदेत मांडला. या अर्थसंकल्पावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा अर्थसंकल्प मध्यमवर्गीच्या इच्छापूर्तीचा अर्थसंकल्प आहे, असं राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचे मी आभार मानतो. कारण त्यांनी नुकताच सादर केलेला अर्थसंकल्प हा अमृतकाळातील सर्वजणहिताय असा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात जे लोक विकासात मागे आहेत, आपले तरूण आहेत, शेतकरी, छोटे उद्योग, मध्यमवर्गीय या सर्वांना लक्षात घेता या अर्थसंकल्पाची रचना करण्यात आली आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

विशेषता पुढच्या २५ वर्षांमध्ये जो एक विकसित भारत आपण म्हणतोय. त्याच्याकडे जाण्याचा रस्ता या अर्थसंकल्पाने स्पष्ट दाखवला आहे. या अर्थसंकल्पाला ग्रोथ बजेट म्हणता येईल. याला शेवटच्या व्यक्तीचा विचार करणारं बजेट म्हणता येईल, अशा सर्व प्रकारच्या लोकांना या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणात मदत मिळते आहे, असंही फडणवीस म्हणाले.

दहा लाख कोटी रूपयांची पायाभूत सुविधांवरची गुंतवणूक ही देशातील मोठ्याप्रमाणावर रोजगार निर्मिती करणारी आहे. २७ कोटी लोक ईपीएफओच्या अंतर्गत येणं म्हणजे गेल्या आठ वर्षात औपचारिक क्षेत्रात वाढलेला रोजगार हा स्पष्टपणे दिसतो आहे. या सुविधांवरील गुंतवणुकीमुळे मोठा फायदा होणार आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button