‘मविआ सरकारने भाजप कार्यकार्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले’; देवेंद्र फडणवीस
![Devendra Fadnavis said that Mavia government filed false cases against BJP workers](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/devendra-fadnavis-4-780x470.jpg)
राज्यात स्थापना झालेले सरकार १०० टक्के कायदेसंमत
नाशिक : नाशिकच्या सातपूर येथे भाजपचे दोन दिवसीय प्रदेश कार्यकारिणी बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे, पंकजा मुंडे, मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार आदी प्रमुख नेते उपस्थित होते.
आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात ४५ आणि विधानसभेच्या २०० जागा जिंकण्यासाठी भाजपने महाविजय- २०२४ अभियान शनिवारी जाहीर केले. राष्ट्रवाद आणि विकासाच्या मूलमंत्राने विरोधकांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी समाजमाध्यमांवर सक्रिय व्हा, असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना केलं.
महाविकास आघाडी सरकारने भाजप कार्यकार्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले. पल्याला कारागृहात टाकण्यासाठी जंग जंग पछाडले होते. पण ते काही करू शकले नाहीत. त्यांनी ही जबाबदारी दिली, तेच कारागृहात गेले, असा टोलाही देवेंद्र फडणवीसांनी लगावला आहे.
उरलेसुरले लोक पक्षांतर करू नये, म्हणून त्यांना तसे बोलावे लागते. राज्यात स्थापना झालेले सरकार १०० टक्के कायदेसंमत आहे. न्यायालयाचा निकालही आपल्या बाजूने येणार आहे. हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करून नव्याने दीडपट जागा जिंकून पुन्हा सत्तेवर येईल, असंही फडणवीस म्हणाले.