विधानसभा आमदारांची संख्या वाढणार; देवेंद्र फडणवीस यांचं सूचक विधान
![Devendra Fadnavis said that his assembly seats will increase in 2026](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/10/Devendra-Fadnavis--780x470.jpg)
मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा आमदारांची संख्या वाढणार असल्याचे संकेत दिले आहेत. विधानसभेच्या आमदारांची संख्या ३०० पेक्षा जास्त होऊ शकते, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
सौमित्रने प्रोजेक्ट म्हणून विधानसभेचं रिडेव्हलपमेंट मोड्यूल तयार केलं आहे. ते मोड्यूल पाहिल्यानंतर मी अतुल भातखळकर यांना विचारलं की, आपण विधानसभेत असताना आपल्याला अशा विधानसभेत बसता येईल का? पण मला असं वाटतं येऊ शकतं. कारण आम्ही याबाबत विचारच करत होतो. २०२६ मध्ये आपल्या विधानसभेच्या जागा वाढणार आहेत. संपूर्ण देशातील विधानसभेच्या जागा वाढणार आहेत. आमदारांची संख्या ३०० जागा होण्याची शक्यता आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवड : गॅस कटिंग करताना भोसरीतील बंद पडलेल्या कंपनीला आग
राहुल नार्वेकर काय म्हणाले?
आम्ही विधान परिषद आणि विधान सभेसाठी एक नवीन वास्तू बनविण्याचा विचार करत आहोत. आणि त्यामुळे आम्ही तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी येऊ, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले.