‘भाजपाचं सरकार येणार नाही, तर..’; देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान
![Devendra Fadnavis said that BJP government will not come but grand coalition government will come](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/10/Devendra-Fadnavis-and-Raj-Thackeray-1-780x470.jpg)
Devendra Fadnavis | राज्यात २०२४ मध्ये भाजपचे सरकार येणार आहे. २०२९ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरकार येणार आहे, असे विधान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले होते. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी राज ठाकरेंचा आभारी आहे, पण भाजपाचं सरकार येणार नसून महायुतीचं सरकार येणार आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
मी राज ठाकरेंचा आभारी आहे. त्यांच्या शुभेच्छा नम्रपणे स्वीकारतो. पण भाजपाचं सरकार येणार नसून महायुतीचं सरकार येणार आहे आणि महायुतीचाच मुख्यमंत्री असेल, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.
हेही वाचा – ‘एकनाथ शिंदेंनी पक्षाचं चिन्हआणि नाव घेतलं, ते चुकीचं केलं’; अमित ठाकरेंचं विधान
माहिम विधानसभा मतदारसंघाबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महायुतीमध्ये आमची अजून बोलणी सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज ठाकरे, मुंबईचे आमचे अध्यक्ष आशिष शेलार चर्चा करत आहोत. आम्ही सर्व एकत्र राहोत, यासाठी मार्ग काढला जात आहे.