breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

..तर मी राजीनामा देऊन राजकीय सन्यास घेईन; देवेंद्र फडणवीस यांचं विधान

Devendra Fadnavis | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षण देतील पण त्यांना फडणवीस आरक्षण देऊ देत नसल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी करत देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केले होते. दरम्यान, यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जर एकनाथ शिंदे यांनी सांगितले, मराठा आरक्षणाकरता त्यांना निर्णय घ्यायचाय पण त्यांच्या निर्णयामध्ये मी अडथळा आणला असेल, तर मी त्याच क्षणी राजीनामा देऊन आणि मी राजकारणाचा सन्यास घेईन, असं मोठं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, जरांगे यांचं माझ्यावर विशेष प्रमे आहे हे मला माहिती आहे पण राज्याचे सगळे अधिकार हे मुख्यमंत्र्यांकडे असतात. इतर सर्व मंत्री मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अधिकारावर काम करत असतात. एकनाथ शिंदे आणि मी एकत्रित काम करतो. शिंदेंना पूर्ण पाठबळ आणि पाठिंबा माझा आहे. त्यामुळे जरांगेंनी केलेल्या आरोपावर एकनाथ शिंदेंनी उत्तर द्यावं. मी मराठा आरक्षणाच्या मध्ये येतोय असं मुख्यमंत्री म्हणाले तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईन आणि राजकारणातून निवृत्त होईन.

हेही वाचा    –    ..तर मला आरसीबी संघात जायला आवडेल; रिंकू सिंगचे मोठं विधान 

आजपर्यंत मराठा समाजासाठी जे काही निर्णय झाले ते एकतर मी केले नाहीतर शिंदेंनी केले. एकनाथ शिंदेंच्या पाठिशी मी भक्कपणाने उभा राहिलो आहे. परंतु अशाप्रकारे जाणीवपूर्वक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न अतिशय अयोग्य आहे असं सांगत देवेंद्र फडणवीसांनी जरांगेंच्या आरोपावर प्रत्युत्तर दिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button