मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांना पहिली पसंती तर अजित पवारांना दुसरी पसंती
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका आता झाल्या, तर महाराष्ट्रामध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याबाबत एक नवा सर्वे समोर आला आहे. तसेच मुख्यमंत्री पदासाठी सर्वाधिक पसंती कोणाला आहे, याबाबतही या सर्वेतुन अंदाज वर्तविण्यात आला आहे.
‘न्यूज अरेना इंडिया’ या संस्थेच्या सर्वेमुसार भाजप १२३-१२९ जागा मिळवेल असं सांगितले आहे तर शिवसेना शिंदे गटाला २५ जागा मिळतील. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसला ५५-५६ जागा मिळेल आणि काँग्रेसला ५०-५३ जागा मिळतील आणि महत्वाचे म्हणजे या सर्वेत शिवसेना ठाकरे गटाला सर्वात कमी शिवसेना ठाकरे गटाला जागा मिळणार असल्याचं म्हटलं आहे. या सर्वेनुसार ठाकरे गटाला १७-१९ जागा मिळणार असल्याचं सांगितलं आहे.
हेही वाचा – ‘आदिपुरूष सिनेमावर बहिष्कार घाला’; कालीचरण महाराजांची मागणी
मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांना सर्वाधिक पसंती आहे. देवेंद्र फडणवीस यांना ३५ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. तर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांना २१ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना १२ तर उद्धव ठाकरे यांना ९ टक्के लोकांनी पसंती दिली आहे.