breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशमुंबईराजकारणराष्ट्रिय

महाराष्ट्र – कर्नाटक सीमेवर आज झालेली घटना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या समोर मांडणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद दिवसेंदिवस चिघळत असून, राज्यातील शिंदे फडणवीस सरकार आता अॅक्शन मोडमध्ये आहे. अशा परिस्थित राष्ट्रवादी काँग्रसेचे अध्यक्ष शरद पवार यांनी 24 तासांत कर्नाटकचे हल्ले थांबले नाहीत तर बेळगावला जाणार असल्याचा धमकी वजा इशाराच दिला आहे. पवारांच्या या इशाऱ्यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.

48 तासात शरद पवार यांना कर्नाटकात जाण्याची वेळ येणार नाही, कर्नाटक सरकार, केंद्र सरकार आणि राज्य सरकार ही परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करेल. पण अॅक्शनला रिअॅक्शन दिली तर हे प्रकरण वाढत जाईल, ज्या कोणाच्या हिताच्या नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रात अशा घटना घडणार यासाठी प्रयत्न केले पाहिजे तसेच, महाराष्ट्र – कर्नाटक सीमेवर आज झालेली घटना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या समोर मांडणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button