breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

‘बलात्काराची तक्रार दाखल न करण्यासाठी पैशांची मागणी’

  • भूषण कुमार प्रकरणात टी-सिरीजच्या मालकांचा आरोप

मुंबई |

बलात्काराची तक्रार दाखल न करण्यासाठी टी-सीरिजचे मालक किशन कुमार यांच्याकडे पैशांची मागणी केल्याप्रकरणी एकाविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. किशन कुमार यांचे पुतणे आणि निर्माते असलेल्या भूषण कुमार यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल न करण्यासाठी पैशांची मागणी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

भूषण कुमार यांच्याविरोधात डी. एन. नगर पोलीस ठाण्यात ३० वर्षीय तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा गुरुवारी दाखल करण्यात आला आहे. टी-सिरीजच्या प्रकल्पात काम देण्याचे आश्वासन देऊन २०१७ ते २०२० या काळात र्लैंगक शोषण केल्याचा आरोप पीडित तरुणीने तक्रारीत केला होता. दरम्यान पीडित तरूणीवर बलात्कार केल्याची खोटी तक्रार पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याची धमकी देऊन पैशांची मागणी करण्यात आल्याचा आरोप आता किशन कुमार यांनी केला आहे. मल्लिकार्जुन पुजारी नावाच्या व्यक्तीने हे पैसे मागितले असे त्यांचे म्हणणे आहे.

पुजारी याने ३ जुलै ते १० जुलै दरम्यान आपल्याकडे पैशांची मागणी केली. तसेच माध्यमांमध्ये बदनामीची धमकी दिली होती, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी आंबोली पोलिसांनी खंडणी मागणे, बदनामी करणे आणि धमकाविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button