breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारणराष्ट्रिय

कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषण प्रकरणी ब्रिजभूषण सिंह यांना दिल्ली कोर्टाचा समन्स

ब्रिजभूषण शरण सिंह यांना १८ जुलै रोजी कोर्टात हजर रहावं लागणार

Brij Bhushan Sharan Singh : भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीगीरांनी जे लैंगिक शोषण आरोप केले आहेत. त्या प्रकरणी त्यांना कोर्टाने समन्स बजावलं आहे. त्यामुळे आता ब्रिजभूषण शरण सिंह यांना १८ जुलै रोजी कोर्टात हजर रहावं लागणार आहे.

कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाच्या आरोपांप्रकरणी आरोपपत्राची दखल घेत राऊज एव्हेन्यू कोर्टाने खासदार ब्रिजभूषण शरण सिंह आणि विनोद तोमर यांना समन्स बजावले आहे. या कलमांमध्ये कलम ३५४ ही आहे. ज्यामध्ये कमीत कमी पाच वर्षे शिक्षेची तरतूद आहे. तर कलम असं आहे की, ३५४ अ नुसार जास्तीत जस्त एक वर्ष शिक्षेची तरतूद आहे. तर ३५४ ड नुसार पाच वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे.

हेही वाचा – ‘भारतीय सिनेमांत फक्त हिप्स आणि बूब्सवर फोकस’; प्रियांका चोप्राचं विधान चर्चेत

मी १८ जुलै रोजी न्यायालयात हजर होणार आहे. मला न्यायालयात हजर राहण्यापासून सूट नको आहे, असं ब्रिजभूषण शरण सिंह यांनी म्हटलं आहे.

https://twitter.com/ANI/status/1677243067244634119

नेमका काय आहे प्रकरण? 

जानेवारी महिन्यात कुस्तीगीर दिल्लीतल्या जंतर मंतर या ठिकाणी आंदोलनाला बसले होते. त्यानंतर तीन महिन्यांनी म्हणजेच एप्रिल महिन्यात महिला कुस्तीगीरांनी पुन्हा एकदा आंदोलन केलं आणि ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात FIR दाखल करण्याची मागणी केली. सर्वोच्च न्यायलयाने या प्रकरणात लक्ष घातल्यानंतर FIR दाखल झाली. पण ब्रिजभूषण यांना अटक झाली नाही. त्यानंतर हे आंदोलन चांगलंच चिघळलं होतं. मात्र सरकारने या आंदोलनात मध्यस्थी केली त्यानंतर हे आंदोलन मैदानातून मागे घेण्यात आलं. आता याच सगळ्या आरोपांप्रकरणी ब्रिजभूषण शरण सिंह यांना कोर्टात हजर रहावं लागणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button