Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘प्राजक्ताने करूणा मुंडेंना उत्तर द्यायला हवं होतं’; दीपाली सय्यद यांचं वक्तव्य

मुंबई | मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीचं नाव धनंजय मुंडे यांच्यासोबत जोडलं गेल्यानंतर प्राजक्ताने संताप व्यक्त केला. पत्रकार परिषद घेऊन तिने तिची भूमिका मांडली. तसंच, तिच्यावर चिखलफेक करण्याऱ्यांनी माफी मागावी, असं आवाहनही केलं. तिच्या भूमिकेनंतर तिच्या समर्थनार्थ अनेकजण उतरले आहेत. आता, अभिनेत्री आणि शिवसेना (शिंदे गट) नेत्या दीपाली सय्यद यांनीही सुरेश धस यांच्यावर टीका केली आहे.

दीपाली सय्यद म्हणाल्या, की संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. त्यांच्या न्यायासाठी सर्व पक्ष एकत्र आले होते. यामुळे संतोष देशमुख यांना न्याय मिळेल अशी आशा जागा झाली. काल मी प्राजक्ताची पूर्ण पत्रकार परिषद पाहिली. प्राजक्ताला रडताना पाहिलं तेव्हा वाईट वाटलं. कारण तिने रडलं नव्हतं पाहिजे. ती महाराष्ट्राची आवडती कलाकार आहे. तुला तुझं मत मांडण्याचा पूर्ण हक्क आहे.

हेही वाचा    –    विजयस्तंभ परिसराच्या विकासाकरीता १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल; सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट

करुणा धनंजय मुंडेने जेव्हा तिचं नाव घेतलेलं तेव्हाच तिने तिचं मत मांडायला हवं होतं. तिला ठासून विचारायला पाहिजे होतं की मी काय असं केलंय की तुम्ही माझं नाव घेताय? करुणा मुंडे ही धनंजय मुंडे यांची पत्नी आहे. याप्ररकरणात सुरेश धस चुकीचे आहेत. सुरेश धस यांनी संतोष देशमुख यांच्यासाठी लढा उभारला. पण आता कलाकारांची नावं घेणं चुकीचं आहे. याचा अर्थ तुम्ही सर्व कलाकारांना एकत्र आणलं. त्यांनी प्राजक्ताची नव्हे तर सर्व कलाकारांची माफी मागितली पाहिजे, असं दीपाली सय्यद म्हणाल्या.

कलाकारांच्या नावामागे ग्लॅमर आहे, त्यामुळे तुम्ही त्यांची नावं घेता. कारण त्यांचं नाव घेतलं की ते माध्यमातही येतं. राजकीय नेतेच कला-क्रीडा महोत्सव करतात. मोठ मोठ्या कलाकारांना बोलावलं जातं. याचा अर्थ तुम्ही बोलताय हे सर्व कलाकार असेच आहेत का? अशा पद्धतीने कलाकारांचं नाव का घेता? नाहीतर तुम्ही पुरावा द्या, असंही दीपाली सय्यद म्हणाल्या.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button