‘संजय राऊत पवारांसाठीच काम करतात’; राऊतांवर शिंदे गटातील नेत्याची हल्लाबोल
![Deepak Kesarkar said that Sanjay Raut works only for Pawar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/sanjay-raut-and-sharad-pawar-1-780x470.jpg)
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अयोद्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावरून राज्यामध्ये ज्यांनी पाप केलं अयोध्येला जात असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली होती. दरम्यान, शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे.
संजय राऊत हे पाप करतात. ते लोकांची मनं दुखावतात आणि राऊत हे रोजच करतात. त्यामुळे त्यांनी गंगेत जाऊन स्नान केलं पाहिजे. पाप मुक्त झालं पाहिजे. खरं तर ते मुळातच ठाकरे फॅमिलीशी लॉयल नाहीत, असं दीपक केसरकर म्हणाले.
संजय राऊत पवारांचे आहेत आणि पवारांसाठीच काम करतात. राष्ट्रवादीसाठी काम करतात. तर राष्ट्रवादीने त्यांना जी ड्युटी दिलेली होती, शिवसेना फोडायची ती त्यांनी केलेली आहे. त्याच्यामुळे माझी खात्री आहे की त्यांचे आता समाधान झालेले असेल. आता त्यांनी शांत राहणं योग्य होईल, असंही दीपक केसरकर म्हणाले.