breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारण

चिखलीत दररोज पाणीपुरवठा सुरू करावा; मनसेचे आयुक्तांना पत्र

लवकर पाणीपुरवठा प्रकल्प सुरु करावा, अन्यथा मनसेचा दणका

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहराला दररोज पाणीपुरवठा सुरू करण्याबाबत आज मनसेच्या वतीने आयक्तांना पत्र देण्यात आले. पिंपरी चिंचवड शहरात आज जवळपास २ वर्षाहून अधिक काळ ‘दिवसाआड’ पाणी पुरवठा सुरु आहे. तरी पिंपरी चिंचवड शहराला दररोज पाणीपुरवठा सुरू करण्यात यावा अशी मागणी नगरसेवक मनसेचे शहर अध्यक्ष सचिन तुकाराम चिखले यांनी केली.
तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी २५ नोव्हेंबर २०१९ पासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला, परंतु आजतागायत तो लागू आहे. प्रशासनाची अडचण समजून शहरातील नागरिकांनी पालिकेस सहकार्य केले.
तत्काळ या मागणीचा पुनर्विचार करून आपण शहरवासियांना नियमित पाणी देऊन दिलासा द्यावा, अशी अपेक्षा करतो, तसेच लवकरात लवकर चिखली पाणीपुरवठा प्रकल्प सुरु करावा अशी आपणास विनंती, अन्यथा मनसेला पुढील काळात कठोर भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा मनसेने दिला.
पाणी पुरवठा अधिकारी टकले साहेब यांनी खाली येऊन निवेदन घेतले व त्यांनी सांगितले की आयुक्त यांच्या बरोबर चर्चा करुन चिखली पाणीपुरवठा प्रकल्प लवकर चालु करण्यात येईल.
यावेळी, मध्ये अश्विनीताई बांगर महिला शहराध्यक्ष , सीमाताई बेलापूरकर महिला शहर सचिव, संगीता ताई देशमुख उपाध्यक्ष, विद्या कुलकर्णी, सचिन चिखले , विशाल मानकरी , राजू सावळे, चंद्रकांत बाळा दानवले, रुपेश पटेकर, दत्ता देवतरासे, मयूर चिंचवडे, सुशांत साळवी, नितीन सूर्यवंशी, शिवकुमार लोखंडे, तुकाराम शिंदे, अमर माळी, नितीन चव्हाण, राजू भालेराव, राजेश अवसरे, श्रद्धा देशमुख, कैलास दुर्गे, निलेश नेटके, कृष्णा महाजन, सुरेश सकट, विशाल उकिरडे, सोनू भोसले, ॲलेक्स आप्पा मोजेस, नारायण पठारे, शिशिर महाबळेश्वर कर, रोहित काळभोर, मंगेश भालेकर, रोहित थोरात, बाळा शिवशरण, आशिष शेलार, सागर शिंदे, जय सूर्यवंशी, आकाश सागरे हे उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button