‘प्रशासन ढिम्म, नागरिक आजारी’; रुपीनगर परिसरात अशुद्ध पाणी पुरवठा
शिवसेचे नेते दादासाहेब नरळे यांचा प्रशासनाला अंदोलनाचा इशारा
![Dadasaheb Narle said that impure water is being supplied in Rupinagar area](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/Dadasaheb-Narle--780x470.jpg)
तळवडे व सहयोगनगर या भागात कमी दाबाने पाणी पुरवठा
पिंपरी : पिंपरी चिंचवड स्मार्ट शहर अशी बिरुदावली मिरवणाऱ्या महापालिकेपासून ४ ते ५ किमीच्या अंतरावरील रुपीनगर नगर परिसरातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून गढूळ पाणी प्यावे लागत आहे. गढूळ पाणी पिऊन परिसरातील जवळपास २० टक्के नागरिकांना गंभीर आजारांची लागण झाली आहे. मात्र, प्रशासनाचे या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याची संत्पत प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. हे सर्व नागरिकांचे प्रश्न लक्षात घेता शिवसेचे नेते दादासाहेब सुखदेव नरळे यांनी प्रशासनाला धारेवरती धरत प्रशासनाला स्वच्छ पाणी पुरवठा करण्यासाठी विनंती केली.
रुपीनगर परिसरातील रहिवाशांना गढूळ पाणी येत असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत. पावसाळा संपवून उन्हाळा सुरू झाल्यापासून नागरिकांना पिण्यासाठी गढूळ पाण्याचा वापर करावा लागत असल्याने त्यांना झुलाब, उलट्या, ताप या आजारांची लागन होण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या हद्दीमध्ये सध्या सध्या विविध प्रकारचे आजार डोके वर काढत आहेत. परिसरातील रहिवाशांना गढूळ पाणी येत असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत. उन्हाळा सुरु झाल्यापासून नागरिकांना पिण्यासाठी गढूळ पाण्याचा वापर करावा लागत असल्याने त्यांना झुलाब, उलट्या, ताप या आजारांची लागन होण्याची शक्यता बळावली आहे, असं दादासाहेब नरळे म्हणाले.