ताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारणराष्ट्रिय

कोट्यवधी महिलांची बजेटकडे नजर

अर्थसंकल्पात बड्या घोषणांची शक्यता

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या २३ जुलै रोजी लोकसभा निवडणुकीनंतरचा पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यावेळच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात महिलांसाठी अर्थमंत्री अनेक मोठ्या घोषणा करू शकतात, असे मानले जात असून यामध्ये घरगुती गॅसपासून आरोग्य सेवांपर्यंत अनेक गोष्टींवरील सबसिडी वाढवली आणि नव्याने दिली जाऊ शकते.

त्याचप्रमाणे, महिला सक्षमीकरणासाठी लखपती दीदी योजनेसह महिला व्यावसायिकांना करात सवलत देण्याची घोषणा होऊ शकते. अर्थमंत्र्यांच्या या सर्व घोषणांवर देशातील कोट्यवधी महिलांच्या आशा पल्लवित झाल्या असून, यावेळी सरकारच्या निर्णयामुळे त्यांच्या आयुष्यात बदल घडून येतील, असाही विश्वास पाहायला मिळत आहे.

लखपती दीदीची व्याप्ती वाढणार?
आर्थिकदृष्ट्या महिलांना सक्षम करण्याच्या हेतूने सरकारने अर्थसंकल्प २०२४ मध्ये ‘लखपती दीदी’ योजना सुरू केली. ज्यामध्ये लखपती दीदी या बचत गटाच्या सदस्या आहेत, ज्या एका वर्षात एक लाख किंवा त्याहूनही अधिक कमाई करू शकतात. यावेळच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात सरकारने योजनेची व्याप्ती वाढवावी जेणेकरून देशभरातील महिलांना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी मदत होऊ शकेल. अर्थमंत्र्यांनी यापूर्वीच लखपती दीदी बनवण्याचे टार्गेट दोन कोटींवरून तीन कोटींवर वाढवले आहेत.

आर्थिक सहभागात महिलांचे योगदान
व्यवसायात महिलांचा सहभाग वाढावा आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी सुलभ अटींवर कर्ज उपलब्ध करून देण्याची महिलांची मागणी आहे. याशिवाय महिलांचा मायक्रोफायनान्स प्रवेश सुलभ व्हायला हवा, तसेच महिलांच्या नेतृत्वाखालील उद्योगांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी संभाव्य कर सूट आणि कपातीचा लाभ मिळवा.

आरोग्यासह जीवनावश्यक सेवांवर अनुदान
महागडी औषधे आणि महागड्या सिलिंडरच्या किंमतीमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. देशातील अनेक गरजू महिला पैशांअभावी आपल्या आरोग्याची काळजी घेऊ शकत नाहीत. अशा स्थितीत त्यांना आरोग्य सेवा, स्वयंपाकाचा गॅस यांसारख्या अत्यावश्यक गोष्टींवर सबसिडी द्यावी, अशी त्यांची मागणी आहे. त्याचवेळी, आरोग्य तपासणी व्हावी यासाठी मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात यावे. या सर्वसाधारण अर्थसंकल्पात महिलांच्या या मागण्या अर्थमंत्री पूर्ण करतील, असे जाणकारांचे मत आहे. महिलांचे चांगले आरोग्य सक्षम करण्यासाठी सरकार अंगणवाडी आणि पोषण २.० मोहिमेचे बजेट वाढवू शकते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button