शरद पवारांचे नाव ‘या’ क्रिकेट स्टेडियमला मिळणार?
पुणे : गुजरातमधील मोटेरा स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या क्रिकेट स्टेडियमला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.
क्रिकेट हा आपल्या भारतीयांचा श्वास आहे, क्रिकेटचा सामना सुरू असताना प्रत्येक क्षणाला भरलेला उत्साह भारतीयांच्या नसानसातून वाहतो, हे आपण जाणतो, याच क्रिकेट विश्वास महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपण आयपीएलच्या धर्तीवर महाराष्ट्र प्रीमियर लीग या स्पर्धेते आयोजन केले व महाराष्ट्रातील खेळाडूंना उच्चस्तरीय संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल आपले मनस्वी अभिनंदन.
भारतीय क्रिकेट विश्वाला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचे काम पद्मविभूषण आदरणीय खासदार शरद पवार साहेबांनी त्यांच्या कारकिर्दीत केलेले आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन, बीसीसीआय ते अगदी आयसीसीच्या अध्यक्ष पदावर आदरणीय साहेबांनी काम केले.
हेही वाचा – Adipurush : आदिपुरूषने पहिल्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी, आकडा पाहा..
भारताच्या महिला क्रिकेटला आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जा व संधी मिळवून देणे, देशासाठी खेळलेल्या क्रिकेटपटूंना निवृत्त नंतर पेन्शन मिळवून देणे याप्रकारच्या अनेक सोयी-सुविधा व संधी आदरणीय क्रिकेटर्सला मिळवून दिल्या. क्रीडा विश्वातील खो-खो, कबड्डी सारख्या मातीतील खेळांना आंतरराष्ट्रीय दर्जा साहेबांमुळेच मिळाला.
आदरणीय साहेबांचे क्रिकेट व क्रीडा विश्वातील योगदान सांगायचे म्हटल्यास एक संपूर्ण पुस्तक लिहून तयार होईल, इतके आहे, हे आपणही जाणता! साहेबांच्या या कार्याचा अभिमान आपल्या सर्वांनाच आहे. याच कार्याचा सन्मान म्हणून पुण्यातील गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानास पद्मविभूषण, आदरणीय खासदार शरद पवार साहेबांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे.