breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीराजकारण

तहव्वूर राणाला अतिरिक्त जबाब दाखल करण्याची न्यायालयाची अनुमती

मुंबई | 

पाकिस्तानी वंशाचा कॅनडातील उद्योगपती तहव्वूर राणा याने त्याचे भारतात प्रत्यार्पण करण्याच्या विरोधात अतिरिक्त जबाब सादर करण्याची केलेली विनंती अमेरिकेतील न्यायालयाने मान्य केली आहे. मुंबईवर २००८ मध्ये करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये राणा याचा सहभाग असल्याबद्दल त्याचे भारतात प्रत्यार्पण करण्याची मागणी करण्यात आली आहे. भारताने फरारी घोषित केलेल्या राणा याची वैयक्तिक प्रत्यार्पण सुनावणी १२ एप्रिल रोजी होणार आहे.

राणा याचे भारतात प्रत्यार्पण करण्याच्या भारताच्या मागणीला अमेरिकेने पाठिंबा दिला आहे. राणा याचा अतिरिक्त जबाब २० पानांपेक्षा अधिक नसावा आणि तो ५ एप्रिलपर्यंत सादर करण्यात यावा, असा आदेश लॉस एन्जेलिसमधील जिल्हा न्यायमूर्तींनी दिला आहे. सरकारला राणाच्या अतिरिक्त जबाबाला प्रत्युत्तर दाखल करण्याची गरज नाही, मात्र सरकार प्रत्युत्तर दाखल करू शकते, पण ते प्रत्युत्तर १२ एप्रिलनंतर दाखल करता येऊ शकत नाही, असेही न्यायमूर्तींनी म्हटले आहे.

वाचा- #Covid-19: दैनंदिन रुग्णवाढीचा आज उच्चांक; गेल्या २४ तासांत तब्बल ८१ हजार ४६६ रुग्णांची नोंद

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button