#CoronaVirus: मुंबईत लोकल ट्रेन सुरू होणार का? यावर काय म्हणाले आरोग्यमंत्री; पहा सविस्तर…
![Health minister Rajesh Tope declares 5 lac ruppes compensation to the families of Bhandara hospital fire victims from CM Fund](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/images_1586428595722_rajesh_tope.jpg)
मुंबई: मुंबईत दूरच्या उपनगरांतून नोकरीसाठी प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची सहनशक्ती बुधवारी सकाळी अखेर संपलेली आहे. नालासोपाऱ्यात संतप्त प्रवाशांनी थेट रेल्वे ट्रॅकवर उतरत रेल रोको आंदोलन केलं होते. सरकार आता सामान्यांसाठी रेल्वे सुरू करणार का? असा प्रश्न विचारल्यावर लोकांची मागणी रास्त आहे पण सोशल डिस्टन्सिंगचं काय? असं म्हणत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी थेट उत्तर द्यायचं टाळलेलं आहे.
राज्यात आता पुन्हा लॉकडाऊन करणार नाही, असं स्पष्ट करताना आरोग्य मंत्र्यांनी लोकलसेवा सुरू करण्याचा हा निर्णय सीएम घेतील, असं म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे चेंडू टोलावलेला आहे. Unlock सुरू झालं, खासगी कार्यालयं सुरू झाली पण अद्याप लोकल सेवा सामान्यांसाठी सुरू झालेली नाहीये. त्यामुळे नालासोपाऱ्यात एसटीची वाट पाहून वैतागलेल्या चाकरमान्यांनी थेट रेल्वे रुळावर उतरून रेल रोको आंदोलन केलं आहे.