breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

#CoronaVirus: देशाची गर्वाने मान उंचावली! अमेरिका कोरोनाशी लढण्यासाठी दिल्ली मॉडेलला करतोय फॉलो

नवी दिल्ली: कोरोना व्हायरसशी लढा देणाऱ्या अमेरिकेने दिल्ली मॉडलचा अवलंब केलेला आहे. कोविड -19 रुग्णांवरील उपचार करण्यासाठी प्लाज्मा थेरेपीच्या मॉडलचाही अवलंब केला जात आहे, अशी माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली आहे. यानंतर दिल्लीकरांना शुभेच्छा देत सीएम अरविंद केजरीवाल यांने ट्विट करुन सांगितलेले आहे.

केजरीवाल म्हणाले की, अमेरिका जे आज करीत आहे. भारत ते उद्या करेल. मात्र दिल्लीने हे बदललं आहे. आता काल दिल्लीने केलं आणि अमेरिका आज करीत आहे. यासाठी दिल्लीकरांना शुभेच्छा देतो आहे. आपल्या देशासाठी ही अत्यंत सन्मानजनक गोष्ट आहे. यापूर्वी डोनाल्ड्र ट्रम्प यांनी घोषणा केली होती की, आज मी चीनच्या व्हायरसविरोधात आमच्या लढाईत वास्तवात एक ऐतिहासिक घोषणा करणार आहे. ज्यामुळे अनेक लोकांचे प्राण वाचू शकेल. आम्ही प्लाझ्मा थेरेपी सुरू करणार आहोत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button