breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

#CoronaVirus: कोरोना कोणत्याही जात, धर्म, भाषेला ओळखत नाही; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना

करोनाचा फटका प्रत्येकाला समान बसला आहे. करोना फैलाव करण्याआधी कोणताही वंश, धर्म, रंग, जात, पंथ, भाषा किंवा सीमा पाहत नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. यामुळे करोनाशी लढा देताना आपल्याला एकता आणि बंधुता यांना प्राथमिकता दिली पाहिजे असं आवाहनही नरेंद्र मोदींनी केलं आहे. आपण सर्वजण या संकटात एकत्र असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. नरेंद्र मोदी यांनी LinkedIn वर एक पोस्ट शेअर केली असून त्यामधून करोना संकट आणि त्याच्याशी सामना करण्यासंबंधी भाष्य केलं आहे.

“इतिहासात याआधी देश आणि समाज एकमेकांच्या विरोधात उभे राहत होते. पण आज संपूर्ण जग मिळून एका आव्हानाचा सामना करत आहे. त्यामुळे भविष्यात एकत्रित आणि लवचीकपणा महत्त्वाचा असणार आहे,” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. “भारतातून येणाऱ्या नव्या संकल्पना संपूर्ण जगासाठी समपर्क असणं गरजेचं आहे. त्यांच्यामध्ये फक्त भारतच नाही तर संपूर्ण मानवजातीसाठी सकारात्मक बदल करण्याची क्षमता असली पाहिजे,” असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

करोनामुळे काम करण्याची पारंपारिक पद्दत बदलली असून आता लोक आपल्या घरातून काम करत असून घरच ऑफिस झालं आहे आणि इंटरनेट नवी मिटिंग रुम झाली असल्याचं ते म्हणाले आहेत. “मी हे बदल स्विकारत आहे. माझे सहकारी मंत्री असोत किंवा अधिकारी किंवा जागतिक नेते….माझ्या जास्तीत जास्त बैठका आता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होत आहेत,” असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

पुढे त्यांनी सांगितलं आहे की, सहजपणे स्विकारली जाऊ शकते अशी जीवनशैली आणि व्यवसायांची आता गरज आहे. अशाने संकटवेळी आपलं कार्यालय, व्यवसाय आणि कामकाज वेगाने सुरु राहील. तसंच लोकांच्या जीवाला धोका निर्माण होणार नाही याची खात्री होईल.

भारतासारखा तरुण देश जो आपल्या उत्साही विचारसणीसाठी ओळखला जातो तो या नव्या संस्कृतीला पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका निभाऊ शकतो अशी अपेक्षा नरेंद्र मोदींनी यावेळी व्यक्त केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button